Couple abandons infant: प्रवास म्हटला की सोबत लहान मुलंही असतात. त्यातही विवाहित दांपत्य असेल, तर मग अगदी नवजात बाळंही असतात. आपल्या मुलांना नीट प्रवास करता यावा, त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पालक प्रयत्न करत असतात. पण एखाद्या दांपत्याने आपल्या बाळाला विमानतळाबाहेर सोडून देत प्रवास केल्याचं कधी तुम्ही ऐकलं आहे का? नक्कीच नसेल. पण अशीच एक धक्कादायक घटना इस्त्राइलमध्ये घडली आहे.
एका अज्ञात दांपत्याने विमानतळाच्या चेक-इन काऊंटरवर आपल्या बाळाला सोडल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बाळासाठी तिकीट नसल्याने त्यांनी हे कृत्य केलं. CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, हे जोडपे बेल्जियममधील Ben Gurion International Airport वरून ब्रुसेल्सला Ryanair Airlines च्या विमानात चेक इन करत होते. यावेळी त्यांनी आपल्या मुलाला मागे सोडलं.
यानंतर चेक-इन काऊंटरवरील अधिकाऱ्यांनी विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी या दांपत्याला विमाता बसण्यापासून रोखलं.
Ryanair Airlines ऑनलाइन बुकिंग प्रक्रियेदरम्यान लहान मुलांना फ्लाइट आरक्षणामध्ये समाविष्ट करण्याची परवानगी देतात. प्रौढ व्यक्तीच्या मांडीवर बसून बाळाने केलेल्या एकमार्गी प्रवासासाठी विमान कंपनी 27 डॉलर आकारते. जर प्रौढांना बाळाला सीटवर बसून प्रवास करायचा असेल तर वेगळी व्यवस्था करावी लागते.
चेक-इन बंद झाल्यानंतर दांपत्य विमानतळावर पोहोचलं होतं. बोर्डिंग गेट बंद होण्याआधी पोहोचायचं असल्या कारणाने दांपत्याने बाळाला मागे सोडलं आणि सेक्युरिटी चेकसाठी धाव घेतली. मात्र सुरक्षा अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतल्याने बाळ पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाकडे पोहोचलं आहे.