गर्लफ्रेंडने इतक्या जोरात किस केलं की बॉयफ्रेंडच्या कानाचा पडदाच फाटला, नेमकं घडलं काय?

Boyfriend Eardrum Ruptured: चीनमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. किस करत असतानाच प्रियकराचा कानाचा पडदा फाटला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 30, 2023, 08:29 AM IST
गर्लफ्रेंडने इतक्या जोरात किस केलं की बॉयफ्रेंडच्या कानाचा पडदाच फाटला, नेमकं घडलं काय? title=
गर्लफ्रेंडने इतक्या जोरात किस केलं की बॉयफ्रेंडच्या कानाचा पडदाच फाटला, नेमकं घडलं काय?|Boyfriend Eardrum Ruptured after intense kissing with girlfriend in

Boyfriend Eardrum Ruptured: एका व्यक्तीला आपल्याच गर्लफ्रेंडला किस करणे महागात पडले आहे. या व्यक्तीसोबत असं काही भयंकर घडलं की त्याला थेट रुग्णालयातच दाखल करण्यात आले आहे. या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला जवळपास 10 मिनिटापर्यंत किस केले त्यानंतर मात्र त्याच्यावर भयंकर प्रसंग ओढावला. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये 22 ऑगस्ट रोजी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. याच दिवशी हे जोडपे चीनच्या पूर्व प्रांतात असलेल्या झेजियांग प्रांतातील वेस्ट लेकवर सेलिब्रेट करत होते. त्याचवेळी तरुणाने गर्लफ्रेंडला 10 मिनिटांपर्यंत किस केले. दोघांमधील किसिंग इतकं इंटेन्स होत गेले की अचानक तरुणाच्या कानाचा पडदाच फाटला. किस करत असतानाच त्याच्या कानातून कसलासा आवाज आला त्यानंतर त्यांची ऐकण्याची क्षमताच कमी झाली. त्यामुळं तरुण घाबरला व तातडीने त्याने रुग्णालय गाठले. रुग्णालयात गेल्यानंतर त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचे समोर आले. 

रिकव्हर होण्यासाठी लागू शकतात दोन महिने

तरुणावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलं आहे की, त्याला पूर्णपणे रिकव्हर होण्यासाठी जवळपास 2 महिने लागू शकतात. मेडिकल एक्स्पर्ट्स नुसार, किस करत असतानाच अशी स्थिती उद्भवू शकते. याचे कारणही त्यांनी पुढे नमूद केले आहे. 

अन् कानाचा पडदाच फाटला

दीर्घ किस करत असताना कानाच्या आतील हवेवर  दबाव पडू शकतो. अशावेळी जेव्हा पार्टनर दीर्घ श्वास घेतो तेव्हा आत असंतुलन निर्माण होते. ज्याचे परिणाम हा थेट कानावर होतो. त्यामुळं कानाचा पडदाही फाटू शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 

याआधीही घडलं होतं असंच प्रकरण

दरम्यान, चीनमधील हे पहिलेच प्रकरण नाहीये. अलीकडेच चीनच्या दक्षिण भागातूनही असाच एक प्रकार समोर आला होता. त्यावेळी एक जोडपे खोलीत टिव्ही पाहत बसले होते. मात्र, अचानक त्याच्या कानातून आवाज आला व ऐकण्याची क्षमता कमी झाली. डॉक्टरांकडे गेल्यानंतर तपासणी केल्यावर समजले की कानाचा पडदा फाटला आहे. या घटनेमुळं सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. 

कानाचा पडदा फाटण्याची कारणे

आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त किस करतानाच नाही तर अन्य कारणांनीही अचानक कानाचा पडदा फाटू शकतो. यात स्काय किंवा वॉटर डायव्हिंग, फ्लाइंग, भांडणे किंवा रस्ते अपघात यांचा समावेश आहे.