वॉशिंग्टन : अमेरिकेतील (US) ओक्लाहोमा (Oklahoma) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने प्रथम आपली पत्नी आणि 23 महिन्यांच्या मुलीची हत्या केली (Man kills wife and Daughter) आणि नंतर स्वतःवर गोळी झाडली. घटनेच्यावेळी इतर तीन मुलेही घरात होती. परंतु त्यांना कोणतीही इजा करण्यात आलेली नाही. काही लोकांचे म्हणणे आहे की या जोडप्यामध्ये 14.4 कोटी रुपयांची लॉटरी (Lottery) वादाचा विषय होता.
डेलीमेलच्या अहवालानुसार, 42 वर्षीय जॉन डोनाटो याने प्रथम 31 वर्षांची टिफनी हिल (Tiffani Hill) आणि 23 महिन्यांची मुलगी लीन यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर आत्महत्या केली. 30 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. (छाया - डेलीमेल)
ओक्लाहोमाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 23 महिन्यांची लीन गोळी लागल्यानंतर जिवंत होती, त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. पण नंतर तिचाही रुग्णालयात मृत्यू झाला. (छाया - डेलीमेल)
ओक्लाहोमा येथील रहिवासी टिफनी हिल (Tiffani Hill) हिला 9 महिन्यांपूर्वी 1.4 दशलक्ष पौंड अर्थात सुमारे 14.4 कोटी रुपयांची लॉटरी लागली होती आणि काही लोकांचे म्हणणे आहे की या जोडप्यामधील 14.4 कोटी रुपयांची लॉटरी हा वादाचा विषय होता. (छाया - डेलीमेल)
कुटुंबाचे वकील थेरेसा मॅक्गी (Theresa McGhee) म्हणाले, 'जोडप्यामध्ये लॉटरी जिंकणे हा वादाचा विषय होता, पण तो इतका जीवघेणा असू शकतो. आता त्याचे सत्य जाणून घेण्याचा कोणताही मार्ग आपल्याकडे असणार नाही. जरी मला माहीत आहे की काहीवेळा यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष झाला. त्यानी सांगितले की, टिफनी हिला तिच्या पतीला काही काळ सोडून जायचे आहे. (छाया - डेलीमेल)
आता टिफनी हिलचे कुटुंब म्हणते की आता आम्हाला इतर घरगुती हिंसा पीडितांनी तिच्या दुःखद मृत्यूपासून शिकण्याची इच्छा आहे. कुटुंबाने 3 जिवंत मुलांसाठी GoFundMe मोहीम सुरू केली आहे.