Albert Einstein: अल्बर्ट आइनस्टाइन हे महान शास्त्रज्ञ होते यात काही वादच नाही. अलीकडेच त्यांनी लिहलेल्या एका पत्राचा लिलाव करण्यात आला. या पत्राला तब्बल 33 कोटी रुपये किंमत मिळाली आहे. या पत्रात शास्त्रज्ञ आइनस्टाइन यांनी काही वैज्ञानिक इशारे पुन्हा एकदा जगासमोर आणले होते. 1939 साली आइनस्टाइन यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांना लिहिले होते. यात त्यांनी अणुबॉम्ब आणि त्याचा शस्त्र म्हणून होणारा वापर याबाबत इशारा दिला होता. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धातच अमेरिकेकडून जपानच्या दोन शहरांमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये अणुबॉम्ब हल्ला केला होता.
आइनस्टाइन यांनी लिहिलेल्या पत्रात अमेरिकेच्या राष्ट्रपतींना सतर्क केले होते. त्यांनी म्हटलं होतं की, जर्मनी अणुबॉम्बचा शस्त्र म्हणून वापर करत आहेत. यावरुन त्यांनी अमेरिका सरकारला सतर्कदेखील केले होते. पत्रात म्हटलं गेलं होतं की, युरेनियमचा एक नवीन ऊर्जा स्त्रोतामध्ये संचार केला जाऊ शकतो, ज्याचा वापर अधिक शक्तिशाली विस्फोटक बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. सोबत, त्यांनी अमेरिका अणु फ्यूजनवर संशोधन आणि बॉम्ब विकसित करण्याचा सल्ला दिला होता.
आइनस्टाइन यांच्या पत्राचा लिलाव क्रिस्टिज कंपनीने केला आहे. या कंपनीचे वरिष्ठ तज्ज्ञ पीटर क्लारनेट यांनी हे इतिहासातील सर्वात प्रभावशाली पत्र असल्याचे म्हटलं होतं. हे पत्र 1939 साली उन्हाळ्यात लिहिण्यात आलं होतं. तर, 2002 मध्ये मायक्रॉस्फॉटचे को फाउंडर पॉल एलन यांनी 21 लाख डॉलरमध्ये तेव्हा खरेदी केले होते. यापूर्वी या पत्राचे मालक प्रकाशक मॅल्कम फॉर्ब्स होते. त्यांनी हंगरीचे शास्त्रज्ञ लियो जिलार्डकडून ते मिळवले होते.
आश्चर्य म्हणजे, हे पत्र जिलार्ड याने लिहिले होते. त्यावर आइनस्टाइन यांची स्वाक्षरी होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमावर अणुबॉम्ब हल्ला केला होता. त्यानंतर आइनस्टाइन यांनी अणुबॉम्बचा शस्त्र म्हणून झालेल्या वापरावर दुखः व्यक्त केले होते. अल्बर्ट आइनस्टाईन यांनी या अणुबॉम्ब हल्ल्याबाबत तीव्र दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान अमेरिकेने करण्यात आलेल्या हल्ल्यात जवळपास 2 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतही कित्येक काळ त्याचे परिणाम या शहरांवर पाहायला मिळत आहेत.