Buffalo Sperm: आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. इथे दुग्धोत्पादनही (Milk Production in India) खूप मोठ्या प्रमाणात होते. गाय, बैल, रेडा म्हैशी यांचीही खूप कसोशीनं काळजी घेतली जाते. हे प्राणी आपल्याला अनेक जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करतात त्यात दूध तर अव्वल आहेच. त्यातून गाय - म्हैशींच्या शेणाचाही आपण वापर करतो. गावात आजही शेण सारवण्याची परंपरा आहे. पण तुम्हाला माहितीये का की असाच एक रेडा आहे ज्याच्या स्पर्ममधून (Sperm) त्याच्या मालकाला 25 लाख रूपयांचा फायदा होतो. हो, तुम्ही ऐकलंत तर खरं आहे. परंतु हे या मालकानं नक्की शक्य केले तरी कसे? गाय, म्हैशी, रेडा यांचा वापर हा शेतात नागंरणीसाठी केला जातो. शेतात शेतकऱ्यांप्रमाणे या पाळीव प्राण्यांचाही फार महत्त्वाचा भाग असतो. हेच महत्त्व इतर देशांमध्येही आहे. अशाच एका देशात रेड्याचा मालक चक्क स्पर्म विकतो.
परंतु या रेड्याचे असे काय वैशिष्ट्यं आहे की त्याच्या मालकाला त्याच्या स्पर्ममुळे लखपती होतो येते. या रेड्याचा मालक त्याचे स्पर्म्स विकून चक्क लाखो रूपये कमावतो. मोंगकॉल मोंगफेट असे त्याच्या मालकाचे नावं आहे. तो आपल्या रेड्याला बिग बिलियन या नावानं संबोधतो असे कळते. त्याच्या असे 20 रेडे (Buffalo) आणि सोबतच म्हशीही आहेत.
हा त्याचा मालक नक्की असं काय करतो की त्याला त्याच्या रेड्याचे स्पर्म विकून लाखो पैसे मिळतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मोंगकॉल मोंगफेट हे थायलंड येथील कलासिन या गावात राहतात.
कलासिन शहरातील रहिवासी असलेले मोगकोल सांगतात की हा 'बिग बिलियन' (Big Billion) खरेदी करण्यासाठी लोकांना ओढ आहे. हा रेडा खरेदी करण्यासाठी एका शेतकऱ्याने साडेसात कोटीची किंमत त्याला दिल्याचे त्याने सांगितले. मोंगकोलने हा रेडा 12 लाख रुपयांना विकत घेतला. मात्र, आज या रेड्यामुळे तो दुपटीहून अधिक कमाई करू शकला आहे. या रेड्याच्या वीर्याचा (स्पर्म) वापर त्याच्यासारखेच आणखी रेडे तयार करणे किंवा बनवण्यासाठी केला जातो.
भीमा असे या रेड्याचे नाव असून तो मुर्राह प्रजातीची आहे. असे म्हटले जाते की, जोधपूरच्या (Jodhpur) एका पशु मेळ्यात एका परदेशी व्यक्तीने त्याची किंमत 24 कोटी रुपये ठेवली होती. परंतू असं असलं तरी देखील मालकाने त्याला विकण्यास नकार दिला