दराडेबाईंचा दरोडा! नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
नोकरीचं आमिष दाखवून अनेक तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी भावाच्या मदतीनं 44 जणांना 5 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप होतोय. दराडेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
आताची मोठी बातमी! नितीन देसाई मृत्यू प्रकरण, 'या' पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या एन डी स्टुडिओत अंत्यसंस्कार करण्यात आले. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातले अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते. दरम्यान नितीन देसाई यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळकरी मुलीवर भररस्त्यात बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा माज; अटकेनंतर दाखवली Victory साइन
Crime News: कल्याणमध्ये (Kalyan) एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा (Rape) प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीला इतका माज होता की त्याने अटकेनंतरही माध्यमांसमोर बोटं उंचावत विजयाची खून दाखवली.
NCCच्या विद्यार्थ्यांवर तालिबानी अत्याचार, ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमधला Video व्हायरल
एनसीसीच्या विद्यार्थ्यांना तालिबानी शिक्षा केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाण्यातील जोशी-बेडेकर आणि बांदोडकर कॉलेजचे हे एनसीसीचे विद्यार्थी आहेत. सीनिअर असलेल्याच एका विद्यार्थ्याने ही अमानुष शिक्षा दिली आहे.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्पात भीषण अपघात; क्रेन कोसळून 17 मजुरांचा मृत्यू
Samruddhi Expressway Accident Thane: महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरु असतेवेळी गर्डरसह क्रेन कोसळली आणि काळानं 14 मजुरांवर घाला घातला...
मोदींच्या कार्यक्रमाला जाण्यावर शरद पवार ठाम! महाविकास आघाडीमध्ये नाराजी, संजय राऊत म्हणाले...
पुण्यात मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्यावर शरद पवार ठाम आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरलेय. पवारांनी उपस्थिती लावल्यास संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य सजंय राऊतांनी केले आहे.
धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला होता? अपघात की घातपात?
Dharmveer Anand Dighe: ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला आहे, त्यांना ठाणेकर कौल देणार नाहीत. माणूस आपल्यापेक्षा मोठा होऊ नये म्हणून हा घातपात केला असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. यानंतर पुन्हा एकदा दिघे यांच्या मृत्यूची चर्चा सुरु असून अपघात होता की घातपात? असा प्रश्न विचारला जात आहे.
गटारी अमावस्येच्या रात्री हातातून मोठी चुक झाली; भरतीची स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
पोलिसांनी कारवाई केल्यामुळे आता करिअर संपले या भितीने तरुणाने आत्महत्या केली आहे. सुसाईड नोटमध्ये तरुणाने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे.
अशी चूक करु नका; तुंगारेश्वर धबधब्यावर फिरायला गेलेले भलत्याच संकटात सापडले
वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले पर्यटक भलत्याच संकटात सापडले आहेत. येथे फिरायला आलेल्या पर्यटकांच्या दोन कार नदीच्या प्रवाहात अडकल्याची घटना घडली. आज सकाळी हे पर्यटक पर्यटनासाठी तुंगारेश्वर धबब्यावर गेले होते. त्यांना स्थानिक नागरीकांनी विरोध केला मात्र त्यांना न जुमानता या गाडीचालकांनी कार नदीच्या प्रवाहात टाकली. पाण्याला जास्त वेग असल्याने या दोन्ही कार नदीतचं अडकून पडल्या. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून क्रेनच्या साहाय्याने या दोन्ही कार बाहेर काढल्या.
मुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन; 500 नागरिकांचे तातडीने स्थलांतर
मुसळधार पावसाने मुंब्र्यात भूस्खलन झालं. 4 घराचं प्रचंड नुकसान झालंय. तर सुमारे 400 ते 500 जणांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं आहे.
जेल मधून सुटल्यावर पहिली बाईक चोरली आणि मग... आरोपीचे कृत्य पाहून पोलिसांनी लावला डोक्याला हात
कल्याण येथील सोनसाखळी चोरांना अटक करण्यात आली आहे. आरोपी महिन्याभरापूर्वीच जेलमधून सुटला होता.
कल्याण मधील प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चोरी; चांदीची गदा पळवली
दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे कल्याणमधील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातच चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
33 वर्षांच्या राजकारणात अजित पवार पहिल्यांदाच संघ मुख्यालयात; मदनदास देवी यांचे घेतले अंत्यदर्शन
Ajit Pawar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात दाखल झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सोबत होते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट
कल्याण जवळील आंबिवली येथील प्रकल्पात प्रचंड मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासाठी त्यांनी पीडित ग्राहकांसोबत ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली.
ऑनलाईन मागवला कॅमेरा, बॉक्समध्ये निघाला साबण; नवी मुंबईतील तरुणाची फसवणुक
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हालाही ऑनलाईन खरेदीचा फटका बसला होता. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईवरुन तिने हेडफोन मागवला होता. मात्र, घरी आला होता लोखंडाचा तुकडा.
बदलापूरमध्ये भर रस्त्यात गोळीबाराचा थरार! एक तरुण गंभीर जखमी
भर रस्त्यात गोळीबार झाल्याने बदलापूरमध्ये सखळबळ उडाली. या घटनेमुळे बदलापूर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पूरग्रस्तांना मदत करताना हृदविकाराचा धक्का, उरणच्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू
पूरग्रस्ताना मदत करताना उरणचे पोलीस अधिकारी विशाल राजवाडे शहीद झाले. कर्तव्यावर निधन झालेल्या अधिकाऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन केला. शहिद विशाल राजवाडेंच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.
डोंबिवली पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 9 महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा केला 10 दिवसात
डोंबिवलीमध्ये नऊ महिन्यांपूर्वी एका तरुणाची हत्या झाली होती. मात्र, तो अपघात दाखवण्यात आला होता. मृत तरुणाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर 10 दिवसांत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पुणे पोलीस दलातील रियल हिरो, मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या अटकेचा असा रंगला थरार
पुणे पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान बाईकचोरी करणाऱ्या दोघांना अटक केली. तपासात हे दोघंही मोस्ट वाँटेड गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. पुणे पोलिसांचं हे मोठं असल्याचं मानलं जातंय.
विद्यार्थ्यांची ट्रेन चुकू नये म्हणून जीप पळवणं जीवावर बेतलं, भरधाव ट्रेलरने 60 फूट फरफटत नेलं; 6 जण ठार
भिवंडीत मौजे पडघा खडावली फाट्याजवळ कंटेनर (MH 48 T 7532) व काळी पिवळी जीप (MH04E 1771) यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात 6 जण ठार झाले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.