मेलबर्नच्या कसोटीत विराटचा तिसऱ्यांदा वाद, विकेट पडल्यानंतर प्रेक्षकांसोबतचा 'हा' व्हिडीओ पाहाच!

सोशल मीडियावर विराट कोहलीचा आऊट झाल्यानंतर नियंत्रणाबाहेर जातानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.ज्यामध्ये तो ऑस्ट्रेलियन चाहत्यांशी भिडताना दिसत आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 27, 2024, 08:02 PM IST
मेलबर्नच्या कसोटीत विराटचा तिसऱ्यांदा वाद, विकेट पडल्यानंतर प्रेक्षकांसोबतचा 'हा' व्हिडीओ पाहाच! title=

Virat Kohli Viral Video : मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहली चांगली बॅटिंग करताना दिसला नाही. मात्र, तो वादग्रस्त खेळपट्टीवर पुन्हा पुन्हा षटकार आणि चौकार मारत होता. त्यामुळे विराट कोहली पुन्हा एकदा वादात सापडला. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात 36 धावा करून विराट कोहली बाद झाला. बाद झाल्यानंतर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन चाहत्यांशी हुज्जत घातली. त्याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांशी आक्रमकपणे बोलताना दिसत आहे.

विराटसोबत नेमकं काय घडलं? 

मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहली आऊट झाल्यानंतर मैदानातून बाहेर पडत होता. यावेळी तिथे असणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्याला शिवीगाळ केली. विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये जात असताना त्याला चाहत्यांनी काही तरी विचित्र बोलल्यामुळे विराट कोहलीला वाईट वाटले. तो पुढे गेला होता. पण तेवढ्यात तो मागे आला आणि लोकांशी वाद घालू लागला. त्याच क्षणी तिथे उपस्थित  असलेल्या सुरक्षा रक्षकाने कोणताही हस्तक्षेप नकरता विराट कोहलीला थेट आत नेले. 

पाहा व्हिडीओ

मेलबर्नच्या कसोटीत विराटचा तिसऱ्यांदा वाद

मेलबर्न कसोटीच्या सुरुवातीपासूनच विराट कोहली वादात सापडला आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन सलामीवीर सॅम कॉन्स्टन्सच्या खांद्यावर मारले होते. ज्यामध्ये या खेळाडूची मॅच फी कापण्यात आली. यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी त्याला फिल्डिंग करताना चिडवले तेव्हा त्याने त्यांच्यावर च्युइंगम थुंकला. अशातच आता विराट कोहलीने आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन चाहत्यांशी वाद घातला आहे.

विराटने पुन्हा तीच चूक केली

विराट कोहलीने मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात 36 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या जुन्या चुकीमुळे त्याला विकेट गमवावी लागली. विराट कोहलीच्या विकेटपूर्वी इंडिया टीमने 85 धावा केल्या होत्या. त्यानंतर यशस्वी जैस्वालची देखील विकेट गेली. त्यानंतर पुढे इंडिया टीमने पुढील तीन विकेट 6 धावांत गमावल्या. त्यामुळे दुसरा दिवस देखील टीम इंडियासाठी अत्यंत निराशजनक ठरला.