मुंबई : रिलायन्स जिओ गिगाफायबरला टक्कर देण्यासाठी आता इतर कंपन्यांनी कंबर कसली आहे. वोडाफोनची मालकी असलेल्या यू ब्रॉडबॅण्डनं त्यांच्या ग्राहकांना ४ महिन्यासाठी डेटा फ्री देण्याची घोषणा केली आहे. यू ब्रॉडबॅण्डच्या सध्याच्या ग्राहकांना त्यांचा प्लान १२ महिन्यांसाठी अपग्रेड करावा लागणार आहे. १२ महिन्यांसाठी प्लान अपग्रेड केल्यावर ग्राहकांना १६ महिन्यांचा डेटा वापरायला मिळणार आहे.
यू ब्रॉडबॅण्डच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून रिचार्ज करावं लागणार आहे. तुम्ही यू ब्रॉडबॅण्डचा एक महिन्याचा प्लान ३ महिन्यांसाठी अपग्रेड केलात तर १ महिना फ्री डेटा मिळेल. असंच ६ महिन्यांसाठी अपग्रेड केलं तर २ महिने आणि वर्षभरासाठी अपग्रेड केलं तर ४ महिने डेटा फ्री मिळणार आहे. एक वर्षासाठीचा प्लान फक्त सध्या ज्यांच्याकडे ६ महिन्यांचा प्लान आहे, असेच ग्राहक अपग्रेड करू शकतात.
रिचार्ज करताना ग्राहकांना UPGRADE33 हा कोड वापरावा लागणार आहे. ब्रॉडबॅण्डमधली स्पर्धा वाढल्यामुळे नुकतंच बीएसएनएलनंही त्यांचा ब्रॉडबॅण्डचा प्लान अपग्रेड केला होतं.