Xiaomiकडून Redmi Note 11 सीरीज लॉन्च; 5000mAh बॅटरी, 108 MP कॅमेऱ्यासोबत हे खास फीचर

Xiaomi ने भारतात आपल्या Redmi Note 11 मालिकेतील दोन भन्नाट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Xiaomi ने हे दोन्ही स्मार्टफोन तीन प्रकारात लॉन्च केले आहेत.

Updated: Feb 9, 2022, 03:42 PM IST
Xiaomiकडून Redmi Note 11 सीरीज लॉन्च; 5000mAh बॅटरी, 108 MP कॅमेऱ्यासोबत हे खास फीचर title=

मुंबई : Xiaomi ने एका मेगा इव्हेंटमध्ये आपल्या Redmi Note 11 मालिकेतील दोन भन्नाट स्मार्टफोन लॉन्च केले. Xiaomi ने इव्हेंटमध्ये Redmi Note 11S आणि Redmi Note 11 लॉन्च केले. याशिवाय कंपनीने Redmi Smart Band Pro आणि Redmi Smart TVX43 लाँच केले आहे.

किंमत 

Xiaomi ने आपले Redmi Note 11 सीरीजचे दोन्ही स्मार्टफोन तीन प्रकारांमध्ये लॉन्च केले आहेत. Redmi Note 11 च्या 4GB + 64GB ची किंमत 12,499 रुपये असेल. 
6GB + 64GB ची किंमत 13,499 रुपये असेल आणि 
6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये असेल.

त्याचप्रमाणे Redmi Note 11S देखील तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 
Redmi Note 11S च्या 6GB + 64GB ची किंमत 15,499 रुपये असेल. 
6GB + 128GB ची किंमत 16,499 रुपये आणि 
8GB + 128GB ची किंमत 17,499 रुपये असेल.

विक्रीची तारीख 

Xiaomi ने सांगितले की, Redmi Note 11 ची विक्री 11 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होईल. दुसरीकडे, Redmi Note 11S च्या विक्रीसाठी ग्राहकांना 21 फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

कॅमेरा

Redmi Note 11 मध्ये वापरकर्त्यांना 50 MP AI क्वाड कॅमेरा मिळतो. 

यासोबतच 8MP अल्ट्रा वाइड, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सरचे संयोजन उपलब्ध आहे. 

Redmi Note 11S मध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे.