मुंबई: स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅप हे एक परवलीचे अॅप. अनेकांचे तर, या अॅपशिवाय पानही हालत नाही. फेसबुककडे मालकी असलेल्या या अॅपसोबत सुमारे २०० भारतीय जोडले गेलेले आहेत. Whatsapp हे एक चॅट अॅप असून, ते सद्या सुमारे १० प्रादेशिक भाषांना सपोर्ट करते. यात मराठी, हिंदी बंगाली, पंजाबी, तेलगू, तमिळ, उर्दू, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे. पण, इतक्या भाषांमध्ये उपलब्ध असूनही हे अॅप अनेकांना आपल्या भाषेत (स्थानिक) भाषेत वापरता येत नाही. तुम्हालाही Whatsapp स्थानिक भाषेत वापरताना अडचण येते का? या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर, पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
दरम्यान, Whatsapp वापरकर्त्यांना एक सामान्य गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल ती अशी की, व्हॉट्सअॅप हे आपल्या फोनचीच भाषा फॉलो करते. जसे की, आपल्या फोनची भाषा जर मराठी असेल तर, व्हॉट्सअॅपही अॅटोमॅटीकली (स्वत:हून) मराठीत काम करेन. पण, अॅण्ड्रॉईड आणि आयओएसनुसार आपल्याला वेगवेगळी पद्धत अवलंबावी लागले.