मुंबई : How To Increase Internet Speed : अनेकवेळा आपल्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) इंटरनेट वेग मिळत नाही. स्पीड नसल्याने (Slow Internet Speed) व्हिडिओ पाहताना किंवा काम करताना कंटाळा येतो. महत्वाचे काम करत असताना इंटरनेट स्पीड नसल्याने कामात व्यत्यय येतो. त्यामुळे तुम्ही स्मार्टफोनच्या स्लो इंटरनेट स्पीडमुळे हैराण असाल, तर सिम कार्ड (Sim Card) वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. यावेळी तुम्हाला फोनमध्ये इंटरनेटचा स्पीड मिळेल. त्यासाठी एक काम करावे लागणार आहे.
अनेक लोकांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) नेटवर्कची समस्या नेहमीच असते. या समस्येमुळे इंटरनेटचा स्पीड इतका कमी होतो की काहीही करता येत नाही. व्हॉट्सअॅपवर पाठवलेला 'हाय' मेसेज किंवा कोणतीही इमेजही कित्येक मिनिटे पुढे जात नाहीत. त्यामुळे अनेक मोबाईल यूजर्स त्रस्त होतात. काहीवेळा रागाने सिमही बदलून टाकतात. दुसऱ्या कंपनीचे कार्ड घेतात. मात्र, इंटरनेचा त्रास काही संपत नाही.
नेट चांगले मिळत नसल्याने बऱ्याचवेळा कस्टमर केअरला फोन केला जातो. मात्र, तिथेही तुम्हाला जास्तीचा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे त्रासात अधिक भर पडते. केअरला फोन लागला तरी प्रश्न कायमचा सुटत नाही. त्यामुळे जर तुम्हीही या समस्येचे त्रस्त असाल तर आता तुमची समस्या संपणार आहे, कारण तुम्हाला एक सोपी युक्ती सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा इंटरनेट स्पीड वाढवू शकता.
आता आम्ही तुम्हाला ज्या ट्रिकबद्दल सांगणार आहोत, त्यासाठी तुम्हाला काही वेगळे किंवा विशेष करण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला तुमच्या फोनचे सिम कार्ड बदलावे लागेल. स्मार्टफोनच्या सिम ट्रेमध्ये तुम्ही एकाच वेळी दोन सिमकार्ड वापरू शकता. तथापि, तुम्ही ही युक्ती फक्त त्या स्मार्टफोन्सवर वापरू शकता ज्यात 2 सिम कार्ड वापरण्याचा पर्याय आहे.
आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सिम ट्रे वन आणि सिम ट्रे टूचा पर्याय आहे, हे तुम्ही पाहिले असेल. सर्वप्रथम, तुम्हाला तुमचे कोणते सिम कार्ड सिम ट्रे मध्ये आहे आणि कोणते सिम कार्ड सिम ट्रे 2मध्ये आहे हे पाहावे लागेल. जर तुम्ही 'सिम ट्रे वन'मध्ये नॉर्मल कॉलिंग असलेले सिम कार्ड आणि 'सिम ट्रे टू'मध्ये इंटरनेट असलेले सिम कार्ड ठेवले असेल तर तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड कमी होण्याचे हे देखील कारण असू शकते.
तुम्ही लगेच तुमचे इंटरनेट सिम कार्ड पहिल्या सिम ट्रेमध्ये ठेवावे आणि कॉलिंगचे सिम कार्ड दुसऱ्या ट्रेनमध्ये ठेवावे. वास्तविक सिम ट्रे वन मध्ये इंटरनेट स्पीड खूप चांगला असतो. ही एक प्रसिद्ध पद्धत आहे. तुम्ही तुमचे इंटरनेट सिम कार्ड पहिल्या ट्रेमध्ये ठेवताच तुम्हाला दिसून येईल की इंटरनेटचा स्पीड वाढला आहे. म्हणजेच तुम्ही सुपर फास्ट इंटरनेट स्पीडचा आनंद घेऊ शकता.
इंटरनेटचा वेग कमी असल्याच्या तक्रारी अनेक जण करतात. त्रस्त झालेले अनेकजण अनेकदा माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचवेळी, कस्टमर केअर ऑफिसर देखील आपल्या क्षेत्रातील त्यांच्या टॉवरच्या स्थानाची माहिती तपासण्याबरोबरच ग्राहकांना पहिल्या ट्रेमध्ये सिम ठेवण्याचा पर्याय सूचवतात.