मुंबई : कोविडचा संसर्ग पुन्हा वाढल्याने देशात दररोज लाखो नवीन रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या कंपन्या, शाळा आणि महाविद्यालये घरून अभ्यास आणि काम करण्यास सांगत आहेत, त्यामुळे ब्रॉडबँडची मागणी वाढली आहे. Jio, BSNL आणि Airtel कडे अनेक कमी किमतीचे प्लॅन आहेत. जे जास्त स्पीड सोबतच OTT चे फायदेदेखील देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन अभ्यासासाठी करता येतो.
BSNLचा 399 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
BSNL च्या 399 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 200GB डेटा दिला जातो. प्लॅनमध्ये यूजरला 10mbps चा स्पीड मिळतो. डेटा संपल्यानंतर, डेटाचा वेग 2mbps पर्यंत कमी होतो. यासोबत मोफत लँडलाइन कनेक्शन उपलब्ध आहे, ज्याद्वारे अमर्यादित कॉलिंग करता येते.
एअरटेलचा 499 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
एअरटेलच्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 40Mbps च्या स्पीडसह 3.3TB पर्यंत अमर्यादित इंटरनेट उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये विंक म्युझिक आणि शॉ ऍकेडमीचे 1 वर्षाची मेंबरशिप मिळते.
जिओचा 399 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
रिलायन्स जिओचा 399 रुपयांचा प्लॅन 30mbps स्पीड आणि अमर्यादित डेटा आणि कॉलिंग ऑफर करतो.
जिओचा 699 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
जिओचा 699 रुपयांचा प्लॅन अमर्यादित डेटा आणि कॉलिंगसह 100Mbps स्पीड ऑफर करतो. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे.
जिओचा 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
Jio च्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 150Mbps स्पीडसह अमर्यादित डेटा मिळतो, त्यासोबत तुम्हाला मोफत कॉलिंग देखील मिळते. प्लॅनमध्ये 16 अॅप्सची मोफत सदस्यता उपलब्ध आहे, ज्यामध्ये Amazon Prime, Disney Plus Hotstar, Sony Liv, Zee5 आणि Alt Balaji यांचा समावेश आहे.