मुंबई : नवीन वर्ष येत आहे. नव्या वर्षात कार कंपन्या आपले नवे मॉडल लॉन्च करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. २०१८ मध्ये तर ऑटो एक्स्पोचही आयोजन होणार आहे. पण त्याआधी कार्स लॉन्च होणार आहेत. चला जाणून घेऊया त्या गाड्यांबाबत.....
रेडि-गो दॅटसनच्या सर्वात लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे. आता कंपनी याचं एएमटी म्हणजे ऑटोमॅटीक व्हेरिएंट घेऊन येत आहे. या गाडीला ५ स्पीड एएमटी गिअरबॉक्स देण्यात आलाय. या कारची किंमत ३.९ लाख रूपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. या कारचं टॉप मॉडेल ४.१ लाख रूपयांच्या आसपास लॉन्च केलं जाऊ शकतं. यात १.० लिटरचं पेट्रोल इंजिन दिलं जाणार आहे.
लक्झरी काममेकर कंपनी ऑडी ही कार भारतात १८ जानेवारी २०१८ ला लॉन्च करणार आहे. यात २.० लिटरचं डिझल इंजिन दिलं जाणार आहे. हे इंजिन २५२ बीएचपीची पावर जनरेट करतं. इतक्याचं क्षमतेचं पेट्रोल व्हेरिएंटही येणार आहे. ही गाडी २०१६ मध्ये पॅरिसच्या एका मोटार शोमध्ये सादर करण्यात आली होती. नव्या सेकंड जनरेशन ऑडी क्यू ५ या गाडीला A4 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलीये. आधीच्या मॉडलच्या तुलनेत या नव्या कारचं वजन ९० किलोग्रॅम कमी असेल. या कारची स्पर्धा भारतात मर्सिडीज बेंझ जीएससी, बीएमडब्ल्यू एक्स३ या गाड्यांशी असेल.
जॅगवार लॅंड रोव्हर आपल्या नव्या रेंज रोव्हर वेलार एसयूवीला जानेवारीमध्ये लॉन्च करणार आहे. यात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्याय असणार आहेत. इंजिनला ८ स्पीड ऑटोमॅटीक गिअरबॉक्स दिला जाणार आहे.
लॅम्बॉर्गिनी ११ जानेवारीला भारतात ही एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. ४.० लिटरचं ट्विन टर्बो इंजिन असलेली ही एसयूव्ही जगातली सर्वात वेगवान एसयूव्ही कार सांगितली जात आहे. या कारच्या इंजिनाला ८ स्पीड ऑटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात आलाय.
टोयोटा लक्झरी ब्रॅंड लेक्सस एलएस ५००एच सिडॅनला भारतात १५ जानेवारीला लॉन्च करणार आहे. यात ३.५ लिटर वी६ इंजिन दिलं जाणार आहे. हे इंजिन ३५४ बीएचपीची पावर जनरेट करतं. भारतात या कारची अंदाजे किंमत १.५ कोटी रूपये असू शकते.