रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर सादर केली आहे.
Updated: Mar 17, 2018, 11:56 AM IST
मुंबई :रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये युजर्संना ८ महिन्यांपर्यंत दररोज 1.5GB डेटा फ्री मिळेल. पण ही ऑफर फक्त जिओ फायच्या युजर्ससाठी आहे. १९९९ रुपयांना खरेदी केलेल्या जिओफायमध्ये आता ३५९५ रुपयांचा फायदा मिळेल. त्याचबरोबर १२९५ रुपयांचा डेटा मिळेल. याअंतर्गत युजर्स 1.5 जीबी, 2 जीबी आणि 3 जीबी डेटा असलेले प्लॅन्स वापरू शकता.
कसा मिळेल फायदा?
रिलायन्स जिओ १९९९ रुपयांच्या जिओफायमध्ये मोफत डेटा आणि जिओ व्हाऊचर देईल. या ऑफरमध्ये ग्राहकांना एकूण ३५९५ रुपयांचा फायदा मिळेल. या ऑफरमध्ये कंपनी ९९९ रुपयांचा जिओफाय १९९९ रुपायांना देईल. ज्यात १२९५ रुपयांचा बंडल्ड डेटा आणि २३०० रुपयांचे जिओ व्हाऊचर मिळेल.
कोठे मिळेल फायदा?
JioFi खरेदी केल्यावर २३०० रुपये किंमतीचे जिओ व्हाऊचर्स मिळतील. या व्हाऊचर्सचा वापर तुम्ही Paytm, AJio आणि रिलायन्स डिजिटलमध्ये केला जाईल. तसंच रिलायन्स रिटेल स्टोरवर या ऑफरचा फायदा घेता येईल. जिओच्या वेबसाईटवरही हा फायदा मिळेल. या सर्व ऑफर्ससोबत युजर्स प्राईम मेंबरशिप घेऊ शकतात.
कसे वापरता येतील व्हाऊचर्स?
या ऑफरअंतर्गत मिळणाऱ्या व्हाऊचर्समध्ये ८०० रुपयांचे कॅशबॅक व्हाऊचर्स असतील. हे तुम्ही फ्लाईट बुकींगसाठी वापरु शकता. याशिवाय AJio वरुन १५०० रुपयांच्या शॉपिंगवर ५०० रुपयांची सूट मिळेल. तर १००० रुपयांच्या व्हाऊचरचा वापर तुम्ही रिलायन्स डिजिटल स्टोरमध्येही करु शकता. सर्व व्हाऊचर्स माय जिओअॅपवर मिळतील.
गेल्यावर्षीही कमी केली होती किंमत
रिलायन्स जिओने जिओफाय ४ जी हॉटस्पॉटची किंमत गेल्यावर्षीही १९९९ वरुन ९९९ केली होती. अधिकतर युजर्सने जिओफाय घेण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. एअरटेलने देखील किंमत कमी करुन ९९९ केली होती.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.