Instagram bug: Facebook, Instagram आणि Whats App ची पॅरंट कंपनी 'Meta' आपल्या सुरक्षेबाबत अधिक दक्ष असल्याचं पहायला मिळतं. आयटी सेक्टरमधील सर्वात हुशार डोकी Meta आणि Google मध्ये काम करताना दिसतात. मात्र, असं असताना देखील काही ना काही त्रुटी राहूनच जातात. त्यामुळे, हॅकर्स याचा वापर करून डाटा लीक करण्याची भीती असते. अशातच जयपूरच्या एका विद्यार्थ्याने असं काम केलं की थेट इन्टाग्रामने त्याची दखल घेतली. (Jaipur student rewarded with Rs 38 lakh by Instagram for finding a bug)
जयपूरच्या निरज शर्मा (Niraj Sharma) नावाच्या एका विद्यार्थ्याने इन्टाग्रामला धोकादायक बगची (Instagram bug) माहिती दिली आहे. निरजने दिलेल्या माहितीमुळे लाखो इन्टाग्रामची खाती हॅक होण्यापासून वाचली. या बगमुळे फेसबूक तसेच इन्टाग्रामचा देखील डाटा लीक होण्याचा धोका होता. ही बगची माहिती निरजच्या लक्षात आल्यानंतर त्याने मेटा कंपनीला ही माहिती दिली.
निरजने शोधून काढलेला बग खूप धोकादायक होता. या बगद्वारे हॅकर्सला थेट इन्टाग्राम अकाऊंट एक्सेस (Account Access) करता येऊ शकला असता. त्यासाठी हॅकर्सला युझर आयडी (User ID) आणि पासवर्डची (Password) गरज लागली नसती. त्याचबरोबर हॅकर्स रिल्सचे थमनिल्स देखील बदलता आले असते. निरजच्या हा बग लागताच त्याने कंपनीला माहिती पोहचली आणि डेमो दाखवण्यासाठी वेळ मागितली.
दरम्यान, मेटाने निरजला डेमो देण्यासाठी बोलवून घेतलं आणि निरजने फक्त 5 मिनिटात डेमो देत आपलं म्हणणं सिद्ध करून दाखवलं. मेटाने निरजचा रिपोर्ट मान्य केला आणि निरजच्या या कामगिरीबद्दल इन्टाग्रामने त्याला 45,000 डॉलर म्हणजेच तब्बल 38 लाख रुपयांचं बक्षिस देखील दिलं. मात्र, बक्षिसाची रक्कम देण्यास उशिर झाल्याने निरजला फेसबूकने अतिरिक्त 3.6 लाख रूपये देखील दिले आहेत.