भारतातल्या सर्वात Comfortable 7-Seater वर 3.15 लाखांची घसघशीत सूट! आता 'या' कारची किंमत...

India Most Comfortable 7 Seater: भारतामधील सर्वात आरामदायक 7 सीटर एसयुव्ही अशी या कारची ओळख असून ही कार प्रिमिअम प्रोडक्ट आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 11, 2025, 10:54 AM IST
भारतातल्या सर्वात Comfortable 7-Seater वर 3.15 लाखांची घसघशीत सूट! आता 'या' कारची किंमत... title=
जाणून घ्या या कारचे फिचर्स आणि नेमकी किंमत

India Most Comfortable 7 Seater: मारुती सुझूकी आणि टोयोटाने एकत्र येत काही गाड्यांची निर्मिती केली असून हा फॉर्म्युला यशस्वी ठरताना दिसत आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही भारतामधील सर्वात आरामदायक 7 सीटर एसयुव्ही म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मारुती सुझूकीची इनव्हेक्टोही चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. महागड्या टोयोटा हायक्रॉसला स्वस्त पर्याय म्हणून इनव्हेक्टोकडे पाहिलं जातं. सध्या या गाडीवर कंपनीकडून मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. इनव्हेक्टो आणि इनोव्हा हायक्रॉस दोन्ही कार एकाच प्लॅटफॉर्मवर म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्यांना आपआपली वैशिष्ट्ये आणि कमतरता आहेत. याच कारबद्दल जाणून घेऊयात..

कारमध्ये काय काय आहे?

'इनव्हेक्टो' ही प्रिमिअम 7 सीटर एसयुव्ही कार आहे. यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण फिचर्स आहेत. 10.1 इंचाचा इन्फोटेन्मेंट डिस्प्ले असून त्याला अँड्रॉइड आणि अॅपल कार प्लेचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये 8 प्रकारे अॅडजेस्ट करता येणाऱ्या सीट आहेत. मेमरी फंक्शन, पॉवर टेलीगेट आणि गाडीत उत्तम प्रकाश मिळेल अशी रचना आहे. कारच्या फ्रंट सीट व्हेंटीलेटेड आहेत. कारला पॅनरॉमिक सनरुफ आहे. तसेच कारमध्ये 6 एअर बॅग्स आणि 360 डिग्री कॅमेराही देण्यात आलाय. 

इंजिन कसं?

'इनव्हेक्टो'मध्ये 2.0 लिटर हायब्रीड पॉवर इंजिन असून त्यामधून 150 बीएचपी आणि 188 एनएम टॉर्क निर्माण होतो. कारमध्ये सीव्हीटी गेअरबॉक्स आहे. 'इनव्हेक्टो'मधील इंजिन हे इनोव्हा हायक्रॉसप्रमाणेच आहे. यात फक्त नॉन हायब्रीड पेट्रोल व्हेरिएंट मिळत नाही. पेट्रोल हायब्रीड व्हेरिएंट 23 किलोमीटर प्रती लिटरचं एव्हरेज देतं.

किती सवलत?

'इनव्हेक्टो'चं अल्फा व्हेरिएंट एमव्हाय2025 वर 2.15 लाख रुपयांची सवलत दिली जात आहे. यामध्ये 1 लाखांचा एक्सचेंज बोनस आणि 1.15 लाख स्क्रॅपिंग धोरणाअंतर्गत दिले जातात. 'झेटा' व्हेरिएंटमध्येही अशीच सवलत दिली जाते. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या म्हणजेच एमव्हाय2024 मॉडेलवर अजून सवलत आहे. या कारचं एमव्हाय2024 मधील अल्फा व्हेरिएंटवर 3.15 लाखांची सूट आहे. तर एमव्हाय2024 मधील झेटा व्हेरिएंटवर 2.65 लाखांची सवलत देण्यात आली आहे. 

सवलतीचा विचार केल्यास किंमत किती?

'इनव्हेक्टो'वरील सवलतीचा विचार करता तिची किंमत 30 लाख 59 हजार ते 34 लाख 97 हजारांदरम्यान आहे. (मुंबईतील ऑन रोड प्राइज.) तुम्हाला या सवलतींची माहिती जवळच्या कोणत्याही नेक्सा डिलरकडे मिळू शकते.