Recover Gmail Access: Gmail पासवर्ड विसरला? टेन्शन नका घेऊ, बिना मोबाईल नंबर आणि ई-मेल ID मिळेल ऍक्सेस

आजकाल आपलं सगळं काम गुगलवर चालतं. प्रत्येकाकडे किमान एक तरी जीमेलचा ई-मेल ID असतोच. Android स्मार्टफोन हे मुळात गुगलवर चालतात.

Updated: Aug 20, 2022, 11:19 PM IST
Recover Gmail Access: Gmail पासवर्ड विसरला? टेन्शन नका घेऊ, बिना मोबाईल नंबर आणि ई-मेल ID मिळेल ऍक्सेस   title=

Recover gmail access without mobile number and recovery email: आजकाल आपलं सगळं काम गुगलवर चालतं. प्रत्येकाकडे किमान एक तरी जीमेलचा ई-मेल ID असतोच. Android स्मार्टफोन हे मुळात गुगलवर चालतात.

आपण आपली बऱ्यापैकी खासगी आणि ऑफिसची कामं Gmail वरूनच करतो. अशात जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला तर पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला रिकव्हरी ई-मेल किंवा फोन नंबर गरजेचं असतो. मात्र तुमच्याकडे रिकव्हरी ई-मेल किंवा फोन नंबर नसेल तर टेन्शन घेऊ नका.  

खरंतर एक अशीही पद्धत आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या रिकव्हरी ई-मेलशिवाय तुमचा पासवर्ड तुम्ही रिकव्हर करू शकतात. तुमचा अकाऊंट ऍक्सेस तुम्हाला मिळू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे बिना पासवर्ड आणि रिकव्हरी ई-मेल तुम्ही तुमचं अकाऊंट वापरू शकतात. खालील स्टेप्स फॉलो करा आणि तुमच्या जीमेलचा ऍक्सेस मिळवा. 

  • सर्वात आधी गुगल अकाऊंट रिकव्हरीऑप्शनमध्ये (Google recovery option) जा 
  • इथे तुमचा जीमेल आयडी (Gmail Id ) आणि युजर नेम (User name) टाका 
  • यानंतर फरगॉट पासवर्ड (forgot password )ऑप्शनवर क्लिक करा 
  • आता तुम्हाला स्क्रीनवर तीन ऑप्शन दिसतील 
  • यामध्ये तुम्हाला Enter your password, Get verification email on recovery email किंवा try another way to sign in असे विकल्प तुम्हाला पाहायला मिळतील. 
  • यामध्ये तुम्हाला try another way to sign in ऑप्शनवर क्लिक करा 
  • आता तुम्हाला त्याच डिव्हाइसवर नोटिफिकेशन येईल ज्यावर तुम्ही Log In आहात. 
  • यानंतर तुम्हाला तुमची आयडेंटिटी व्हॅरिफाय (Identity Verificaton ) करावी लागेल.यानंतर Yes, It's Me वर क्लिक करा
  • यानंतर तुम्ही तुमच्या Gmail अकाऊंटवर Sign In व्हाल.

how to recover your gmail access without mobile number or recovery email