नवी दिल्ली : आपला मोबाईल क्रमांक आधारला लिंक करणं अनिवार्य करण्यात आलंय... यासाठी मोबाईल युजर्सना आधार क्रमांक लिंक करण्यासाठी मोबाईल कंपन्यांच्या कस्टमर केअरच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत... पण, आता मात्र ही कटकट बंद होतेय.
यापुढे ग्राहकांना घरी बसल्या बसल्या केवळ एका क्लिकवर आपला मोबाईल क्रमांक एका ओटीपीच्या आधारे आधार क्रमांकाशी जोडता येऊ शकेल.
मिळालेल्या माहितीनुसारह, री-व्हेरिफिकेशन प्रक्रिया लवकरच सोपी करण्यात येतेय. त्यामुळे ग्राहकांना घरी बसल्या मोबाईल क्रमांक आधारशी व्हेरिफाय करता येईल. यासाठी सरकार वन टाईम पासवर्ड (ओटीपी) आणि री-व्हेरिफिकेशनची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
आत्तापर्यंत मोबाईल क्रमांक आधारशी जोडण्यासाठी एनरॉलमेंट सेंटरशी संपर्क साधावा लागत होता. परंतु, या नवीन सेवेचा वरिष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि अपंग व्यक्तींना चांगलाच फायदा होऊ शकेल.
मोबाईल ऑपरेटर्स एसएमएस किंवा आयव्हीआरएस किंवा त्यांच्या मोबाईल अॅपचा वापर करून आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाला जोडू शकतील.