pune news

रणबीर कपूर झाला पुणेकर... 'हे' आहे खास कारण

Ranbir Kapoor Pune Flat : रणबीर कपूरची सध्या चर्चा रंगलेली आहे. आता Animal हा त्याचा चित्रपट सोशल मीडियावर झळकतो आहे. त्याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर हा सोशल मीडियावर आला आहे. आता रणबीर कपूरनं दुसरीकडे एक गोड बातमी दिली आहे त्यानं पुण्यात एक फ्लॅट घेतला आहे. 

Sep 22, 2023, 04:36 PM IST

घाबरवण्यासाठी पत्नीनं अंगावर पेट्रोल ओतताच पतीने पेटवून दिलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime : पुण्यात पतीच्या मारहाणीला कंटाळून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा जीव जाता जाता वाचला आहे. आगीत भाजलेल्या पत्नीला सध्या रुग्णालायात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

Sep 22, 2023, 09:18 AM IST

पुण्यात 'अरेबियन नाईट्स'; परदेशी तरुणींचा विनापरवाना डान्स अन्..., सांस्कृतिक पुण्यात काय चाललंय?

Pune News : सांस्कृतिक पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अरेबियन नाईटच्या नावाखाली पब संस्कृती फोफावत चालल्याचे पाहायला मिळत आहे. तरुणांना आकर्षित करण्यासठी विविध प्रकारच्या ऑफर्स देऊन हॉटेल चालक या कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.

Sep 21, 2023, 11:11 AM IST

Pune Crime News : पुण्यात दोन महिलांची तुंबळ हाणामारी, वडापाव तळण्याची कढई डोक्यात घातली अन्...

Womens Fight In Sadashiv Peth : हत्ती गणपती चौकात दुपारी साडेचार वाजता महिला आपला स्टॉल लावण्यासाठी आल्या. त्यावेळी आधीपासून स्टॉल लावत असलेली महिला अन् नवीन स्टॉल लावणाऱ्या महिलेमध्ये बाचाबाची झाली. 

Sep 20, 2023, 05:23 PM IST

'आमच्यासोबत पंगा घेतला तर असाच मुडदा पाडू'; पुण्यात अल्पवयीन मुलाची धारदार शस्त्राने हत्या

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलाच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. जुन्या भांडणातून झालेल्या वादातून काही तरुणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींनी ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.

Sep 18, 2023, 12:16 PM IST

प्रियकरासाठी काढलं लाखोंचं कर्ज, मात्र हफ्ते न भरल्याने प्रेयसीने स्वतःला संपवलं

Pune Crime : पुण्यात प्रियकरासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते न फेडल्याने प्रेयसीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. या घटनेमुळे मांजरीत खळबळ उडाली आहे.

Sep 16, 2023, 11:28 AM IST

शाहरुखच्या 'जवान'चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद

Jawan Movie Pune Connection: पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये ''जवान चित्रपटाच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. असं मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन म्हटले आहे.

Sep 12, 2023, 08:53 AM IST

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित; महागाई भत्त्यासह सरकारने मान्य केल्या 'या' मागण्या!

ST Employees strike in maharashtra : आमच्या मागण्या मान्य झाल्यानं आपलं उपोषण आंदोलन स्थगित करत आहोत, असं एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.

Sep 12, 2023, 07:17 AM IST

आमदार-खासदारांची मुलं शासकीय शाळेत का शिकत नाहीत? अजित पवारांनी दिले उत्तर

Ajit Pawar On Government School: राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तित कराव्या लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. 30 हजार शिक्षकांची भरती करत असताना त्यात इंग्रजी माध्यमासाठीच्या शिक्षकांची देखील भरती केली जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

Sep 9, 2023, 01:57 PM IST

कपाळ फोडून घेऊ का? सकाळपासून मरमर काम करतो अन्... अजित पवार शिक्षकांवर वैतागले

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शिक्षक पुरस्कार सोहळ्यात बोलताना शिक्षकांचे कान टोचले आहेत. यावेळी अजित पवार यांनी कार्यक्रमाला उशीरा आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला आहे.

Sep 9, 2023, 12:28 PM IST

पुण्याच चाललंय काय? पुन्हा कोयता गँगची दहशत, टिळक रोडवर MPSC करणाऱ्या तरूणांवर हल्ला!

Koyta Gang Attacked On MPSC Aspirant : पुणे शहरातील मध्यावतीत असलेल्या टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघांनी कोयत्याने वार झाले. आज रात्री 2 वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर आलीये. 

Sep 6, 2023, 08:02 PM IST

कुटुंबासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघाला पण चालत्या एसटीमध्येच...पुण्यात मन हेलावणारी घटना

Pune Death In ST:  भोसरी येथून प्रवाशी ज्ञानदेव शिवाजी जाधव आपल्या परिवारासोबत निघाले. त्यांच्यासोबत पत्नी मीना ज्ञानदेव जाधव, मुलगा मयूर ज्ञानदेव जाधव हे होते. सर्वांनी मिळून त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन घ्यायचा त्यांचा प्लान होता.

Sep 6, 2023, 09:03 AM IST

थकलेल्या ऊस बिलासाठी 'जनशक्ती'चे साखर संकुलात घुसून आंदोलन; साखर आयुक्तांच्या खुर्चीचा केला लिलाव

Pune News : थकलेल्या ऊस बिलासाठी 'जनशक्ती'चे साखर संकुलात घुसून घोषणाबाजी करण्यात येत आहे. भीक मागो आंदोलनातून आलेल्या पैशातून साखर आयुक्त व कारखान्याच्या चेअरमनला रक्कम पाठवली जाणार आहे.

Sep 5, 2023, 01:58 PM IST

पुण्यातील जवान लडाखमध्ये शहीद! 'तो' Video Call ठरला अखेरचा; मुलाने विचारलेलं, 'पप्पा तुम्ही कधी...'

Pune News : पुणे येथील भारतीय लष्कराच्या रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे जवान हवालदार दिलीप बाळासाहेब ओझरकर हे रविवारी लडाख प्रदेशात एका रस्ते अपघातात शहीद झाले आहेत. आज त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Sep 5, 2023, 09:18 AM IST