mumbai crime

ताडदेवमध्ये भरदिवसा दरोडा; वृद्ध दाम्पत्याला बांधून घर लुटले, आजीचा 'असा' झाला मृत्यू

Mumbai Crime: ताडदेवमध्ये घडलेल्या या घटनेत 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तिचा पती जखमी झाले आहेत. घटना घडली तेव्हा पीडित सुरेखा अग्रवाल आणि त्यांचे 75 वर्षीय पती मदन मोहन अग्रवाल दोघेच फ्लॅटमध्ये होते

Aug 14, 2023, 11:10 AM IST

बंदुकीचा धाक दाखवत केले अपहरण; आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलावर गुन्हा दाखल

Mumbai Crime : मुंबईतील एका व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनराई पोलीस याप्रकणाचा अधिक तपास करत आहेत.

Aug 10, 2023, 08:33 AM IST

मुलीशी बोलण्यावरुन झालेल्या वादात तरुणाची हत्या; मुंबईच्या रस्त्यावर मध्यरात्री वाहिला रक्ताचा पाट

Mumbai Crime: क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर एका 22 वर्षीय तरुणाचा कथितरित्या खून करण्यात आला. यासोबतच त्याच्या दोन भावांवरदेखील जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन व्यक्तीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aug 2, 2023, 10:13 AM IST

धावत्या ट्रेनमध्ये चौघांवर गोळीबार, विरार स्टेशन येताच साखळी खेचली अन्... जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये नक्की काय घडलं?

Jaipur Mumbai Train Firing : जयपुरहून मुंबईकडे येणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये ( गाडी क्र. 12956 ) सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. चेतन कुमार नावाच्या आरोपीने त्याच्या रायफलमधून 12 गोळ्या झाडत चार जणांची हत्या केली आहे.

Jul 31, 2023, 01:46 PM IST

'शारीरिक संबंध ठेव नाहीतर व्हिडीओ लीक करेन' दक्षिण मुंबईतल्या महिलेला जीम ट्रेनरसोबतची मैत्री पडली महागात

Mumbai Crime: आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये घेतले होते.  जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी आरोपीला विनयभंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक केली.

Jul 31, 2023, 12:55 PM IST

जयपूर-मुंबई धावत्या एक्स्प्रेसमध्ये गोळीबार! चौघांचा मृत्यू, ट्रेन थांबवून डबा सील; आरोपीला अटक

Jaipur-Mumbai Express Firing: आज म्हणजेच 31 जुलै रोजी पहाटे सव्वापाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना धावत्या ट्रेनमध्ये घडली. या गोळीबारामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून या हल्ल्यात काही प्रवासी जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे.

Jul 31, 2023, 08:06 AM IST

पब्जी खेळताना मैत्री, नंतर हॉटेलवर नेले; आता लग्नाचे अमीष देऊन बलात्कार केल्याची तक्रार

मुंबई पोलिसांनी सांताक्रूझ येथे राहणाऱ्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे या तरुणाच्या कथित प्रेयसीनेच पोलिसात तक्रार दिली आहे. काही वर्षांपूर्वी मी PUBG गेम खेळताना या व्यक्तीच्या संपर्कात आले होते.

Jul 25, 2023, 10:13 AM IST

बाईकचा धक्का लागला म्हणून ब्रिजवरच तरुणाची हत्या; नालासोपाऱ्यातली घटना

Nalasopara Crime : बाईकच्या आरशाच्या धक्का लागल्याने झालेल्या वादातून नालासोपाऱ्यात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नालासोपारा उड्डाणपूलावर रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Jul 10, 2023, 12:35 PM IST

'वेश्या व्यवसायात मिळेल खूप पैसा...' अंधेरीच्या हॉटेलमध्ये गरजू महिलांना 'असे' अडकवले जायचे जाळ्यात

Andheri Prostitution busted:  पोलिसांनी घटनास्थळावरुन 15 हजार रुपयांचा एक मोबाईल, रोख रक्कम चार हजार रूपये आणि 1 पेन ड्राईव्ह हस्तगत केला आहे.

Jul 8, 2023, 05:24 PM IST

अवघ्या 26 मिनिटांत मुंबई पोलिसांनी लावला बेपत्ता मुलाचा शोध; आईने मानले आभार

Mumbai News : मुंबई पोलिसांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. मुंबई पोलिसांनी अवघ्या 26 मिनिटांमध्ये बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध लावून त्याला आईच्या स्वाधीन केले आहे.

Jul 3, 2023, 06:20 PM IST

मुंबई असुरक्षित होतेय? 24 वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे, आरोपीने धावत्या लोकलमधून मारली उडी

Mumbai Local Crime News Today: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा भयंकर प्रकार समोर आला आहे. 

Jun 30, 2023, 10:56 AM IST

Video : रस्त्यावर सफाई करणाऱ्या मजुराला कारने चिरडलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime : गोवंडीत दोनच दिवसांपूर्वी दोन मजुरांचा गटारात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता कांदिवलीतही एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Jun 26, 2023, 05:43 PM IST

हा कसला बाप?, पत्नीने संबंध ठेवावे यासाठी 'त्याने' 10 वर्षांच्या मुलालाच संपवले...

Crime News : मुलाची हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी बापानेच रचले मोठे नाटक. त्यासाठी त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीनंतर खुनी बापाचा चेहरा समोर आला.

 

Jun 24, 2023, 12:56 PM IST

मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी! पोलिसांना फोनवर म्हणाला, 24 जूनला स्फोट घडवणार..

Mumbai Pune Bomb Blast Threat: मुंबई आणि पुण्यामध्ये 24 तारखेला स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली असून यासाठी आपल्याला 2 कोटी रुपये मिळाल्याचा दावा फोन करणाऱ्याने केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

Jun 23, 2023, 12:00 PM IST