metro

रिलायन्सला मेट्रोचं भाडं वाढवण्याची मूभा

राज्य सरकारनं मेट्रोच्या दरवाढीविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं महिनाभराच्या सवलतीनंतर म्हणजे ९ जुलैपासून मेट्रोचे नवीन दर लागू होणार आहेत. 

Jun 25, 2014, 01:15 PM IST

गुड न्यूज : आता मेट्रोनं प्रवास करा ५ रुपयांत

मुंबई वन मेट्रोनं सकाळच्या वेळात प्रवास करणाऱ्यांसाठी सवतलीचा दर जारी केलाय. विक डेजमध्ये सकाळी साडेपाच ते 8 या वेळेत प्रवास करणाऱ्यांना यापुढे पाच रुपयांमध्ये कोणत्याही दोन स्थानकांदरम्यान प्रवास करता येणार आहे.

Jun 18, 2014, 07:35 PM IST

घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली नव्या मेट्रो मार्गाची घोषणा

आज राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळं सरकारकडून घोषणांचा पाऊस पडतोय. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो सुरू झाल्यानंतर आता आज मुख्यमंत्र्यांनी नव्या मेट्रो मार्गाची विधानसभेत घोषणा केलीय. घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली-घोडबंदर रोड या मार्गाची घोषणा करण्यात आलीय.

Jun 14, 2014, 12:48 PM IST

वर्सोवा घाटकोपर दरम्यान मेट्रोची 12 स्टेशन

वर्सोवा घाटकोपर दरम्यान साडे अकरा किमीच्या दरम्यान 12 स्टेशन असतील. मेट्रोचा प्रवास वर्सोव्यापासून सुरू होऊन डीएन नगर, आझाद नगर, अंधेरी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकी नाका, असल्फा, जागृती नगर, आणि घाटकोपर शेवटचे स्थानक असेल. मुंबई मेट्रो रेल्वेचं भाडं सुरूवातीला बेस्ट भाड्याच्या दीडपट असेल असा अंदाज आहे. यावरून अंदाजे कमीत कमी भाडे 10 रूपये तर जास्तीत जास्त 40 रूपये इतकं असेल असा अंदाज आहे.

Jun 7, 2014, 05:24 PM IST

प्रतिक्षा संपणार, मुंबईत मेट्रो लवकरच धावणार

मुंबईसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईत लवकरच मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या मार्गातले सगळे अडथळे दूर झालेत. मेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र मिळालंय. आता रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची औपचारिकता फक्त शिल्लक आहे.

May 3, 2014, 11:32 AM IST

अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स’कडे मेट्रोची मालकी?

मुंबईकरांच्या मेट्रो रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात येण्यास अजून अवकाश आहे. मात्र, या मेट्रो रेल्वेला मालक कोण असणार, हे स्पष्ट झालंय.

May 2, 2014, 06:04 PM IST

मोनोनंतर आता मुंबईच्या सेवेत मेट्रो

मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या सुरक्षा आढाव्याचं काम पूर्ण झालंय. आता प्रमाणपत्र मिळण्याची प्रतिक्षा असून त्यानंतर लगेच मुंबईची पहिली वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो सेवेत रुजू होऊ शकेल.

Apr 29, 2014, 08:27 AM IST

मुंबई मेट्रोची माहिती बस स्टॉपवर

मुंबईत मोनो रेल धाऊ लागली. आता मेट्रो रेल्वेची स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची आशा निर्माण झाली आहे. मुंबईकरांना मेट्रोची माहिती व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो-१ रेल्वेची अद्ययावत माहिती आता संबंधित परिसरातील बेस्टच्या बस थांब्यावर मिळणार आहे.

Mar 18, 2014, 09:24 AM IST

नागपूरमध्येही धावणार मेट्रो

मुंबई पाठोपाठ राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातही मेट्रो रेल्वे धावणार आहे. या संबंधीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यता आला.

Jan 29, 2014, 06:27 PM IST

बरं का, मुंबईतील मेट्रो जानेवारीअखेर धावणार

मुंबईतील मेट्रोला कधी मुहूर्त मिळणार, असा नेहमी प्रश्न विचारला जातो. मात्र, हा प्रश्न आता विरावा लागणार नाही. दोन ते तीनवेळा घेण्यात आलेल्या चाचणीनंतर मेट्रो आता २०१४च्या जानेवारी अखरेपर्यंत धावण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनात दिलेत.

Dec 11, 2013, 08:16 AM IST

अखेर मुंबईत मेट्रो धावली, मुंबईकरांना एसीचा प्रवास!

मुंबईत मेट्रो कधी धावणार हा प्रश्न आता मुंबईकरांना विचारा लागणार नाही. मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण झाला आहे. वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो धावली. यशस्वी चाचणी घेण्यात आल्याने प्रत्यक्षात मुंबईकरांना लवकच एसीचा प्रवास अनुभवता येणार आहे.

Nov 9, 2013, 08:44 PM IST

मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न अधुरे?

मेट्रो रेल्वे एक सप्टेंबरपासून सुरु होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण आता हा मुहूर्तही टळला आहे. आता डिसेंबरपासून मेट्रो धावू लागेल, अशी शक्यता आहे.

Aug 31, 2013, 03:07 PM IST

हा कसला नियम...

धोतर घालून मेट्रो रेल्वे स्थानकात गेलेल्या एका वृध्द भारतीयाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखल्याचा प्रकार दुबईत घडला.

Aug 5, 2013, 11:20 AM IST

मेट्रोला हिरवा कंदील, गाडी स्थाकातच

महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर मुंबईतील बहुचर्चित मेट्रोची चाचणी बुधवारी घेण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. स्थानकाबाहेर गेलेली गाडी पुन्हा स्थानकातच आणण्यात आली. त्यामुळे उपस्थितांचा भ्रमनिरास झाला.

May 1, 2013, 10:40 PM IST

मेट्रो धावणार सुसाट, आज होणार चाचणी

महाराष्ट्र दिनाचं अवचित्य साधून मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेची चाचणी घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वर्सोवा येथे या चाचणीला हिरवा कंदील दाखवणार.

May 1, 2013, 11:41 AM IST