assembly 2014

मतं पश्चिम महाराष्ट्राची... पाहा, तुमच्या उमेदवाराची मतं!

मतं पश्चिम महाराष्ट्राची... पाहा, तुमच्या उमेदवाराची मतं!

Oct 19, 2014, 07:39 PM IST

उद्धव ठाकरे 'सध्या वेट अॅन्ड वॉच'च्या भूमिकेत!

विधानसभा निवडणुक 2014 च्या निकालात महाराष्ट्रात शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष म्हणून समोर आलाय. शिवसेनेनं 63 जागांवर विजय मिळवलाय. पण, तब्बल 123 जागांवर विजय मिळवून बहुमताच्या जवळच्या आकड्यापर्यंत (144) पोहचलेल्या भाजपला आता शिवसेना मदत करणार का? की ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रशासन पद्धतीवर खडे फोडत भाजपनं या निवडणुकीत विजय मिळवलाय, त्यांचा टेकू भाजपला सत्तास्थापनेसाठी घ्यावा लागणार?  असा प्रश्न समोर आलाय. यावरच, उद्धव ठाकरेंनी सध्या आपण 'वेट अॅन्ड वॉच'ची भूमिका घेतल्याचं म्हटलंय..

Oct 19, 2014, 06:43 PM IST

भाजपचा ऐतिहासिक विजय! मोदींची ट्विटरवरून प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून दोन्ही राज्यात भाजपला यश दिल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. मोदींनी या विजयाला ऐतिहासिक विजय म्हटलंय. तसंच कार्यकर्त्यांनाही धन्यवाद म्हटलंय.

Oct 19, 2014, 06:20 PM IST

देशात मोदींची लाट कायम, दोन्ही राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच - शाह

दोन्ही राज्यात भाजपाला मिळालेलं यश हे भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे. देशातील जनता मोदी यांच्या पाठिशी उभी राहिली असून पाठिंब्याबद्दल जनतेचे विशेष आभार मानत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशात नरेंद्र मोदींची लाट कायम असल्याचं म्हटलंय. 

Oct 19, 2014, 05:40 PM IST

...राज्यात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेला हा उमेदवार!

माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पक्षाचे बारामती विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अजित पवार राज्यात सर्वाधिक मताच्या फरकांनी निवडून आलेले उमेदवार ठरलेत. 

Oct 19, 2014, 05:34 PM IST

विदर्भात भाजपचाच 'गड', फडणवीस होणार मुख्यमंत्री?

विदर्भ भाजपसाठी 'गड' ठरलाय. विधानसभेच्या ६२ जागांपैकी तब्बल ४३ जागा भाजपनं जिंकल्या आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून ४८०४६ मतांनी विजय मिळवलाय.

Oct 19, 2014, 04:38 PM IST