www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत काँग्रेसनं आम आदमी पार्टीला पाठिंबा दिलाय. दिल्लीच्या नायब राज्यपालांना याबाबतचं पत्र काँग्रेसनं आज रात्री सादर केलं.
आम आदमी पक्षाचे दिल्लीत २८ आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा स्विकारल्यास या नव्या युतीचं सरकार येऊ शकतं. त्यामुळे आता उद्या राज्यपालांच्या भेटीमध्ये आम आदमी पक्ष काय भूमिका घेणार यावरच दिल्लीच्या या विधानसभेचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये सरकार स्थापनेबाबत आम आदमी पार्टीमध्येच गोंधळाचं वातावरण दिसून येतंय. दिल्लीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष या नात्यानं नायब राज्यपाल केजरीवाल यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व पर्याय खुले असल्याचं सकाळी कुमार विश्वास यांनी म्हटलं होतं.
मात्र दुपारी त्याच पक्षाचे अन्य नेते योगेंद्र यादव आणि मनिष सिसोदिया यांनी जोडतोड राजकारणात `आप`ला रस नसल्याचं सांगत ही शक्यता फेटाळली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.