accident

स्कूलबसच्या चाकाखाली विद्यार्थी जखमी

नवी मुंबईत स्कुलबसच्या चाकाखाली येऊन पाचवीत शिकणारा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. ड्रायव्हरनं हेल्पर नसतांना स्कूल बस मागे घेतल्यानं हा अपघात घडला.

Jan 11, 2012, 09:23 PM IST

हरियाणात स्कूलबसला अपघात ९ विद्यार्थी ठार

आज सकाळी हरियाणामध्ये अंबाला येथील गुरू अर्जुनदेव पब्लिक स्कुलच्या स्कूल बसला अपघात झाला आहे. स्कूल बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला, हा अपघात रस्त्यावर असणाऱ्या दाट धुक्यामुळे झाला आहे. त्यात ९ विद्यार्थ्यी ठार झाले आहेत.

Jan 2, 2012, 01:53 PM IST

धुळे अपघातात ५ ठार ८ जखमी

धुळ्यातील अपघातात ५ ठार झालेत. हा अपघात मुंबई - आग्रा महामार्गावर सरवड फाट्याजवळ आज पहाटे झाला. ट्रक- टेम्पो- सुमो या तीन वाहनांमध्ये धडक झाली. अपघातात ८ जखमींपैकी ३ जण गंभीर आहेत.

Dec 31, 2011, 01:36 PM IST

औरंगाबाद अपघातात ३१ प्रवासी जखमी

अकोल्याहून पुण्याला जाणाऱ्या बसला अपघात झाला. या अपघात ३१ प्रवाशी जखमी झालेत. औरंगाबाद येथे आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.

Dec 24, 2011, 09:10 AM IST

आता नवा 'ड्रामा', विद्यार्थ्यांचा विमा

स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा विमा उतरवण्याचे आदेश शिक्षण आणि परिवहन विभागानं दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या विमा योजनेचा खर्च विद्यार्थ्यांच्या पालकांना सोसावा लागणार आहे.

Dec 16, 2011, 05:34 PM IST

सुखोई विमानाला पुण्याजवळ अपघात

पुण्यामध्ये थोड्याच वेळापूर्वी हवाईदलाचे लढाऊ विमान कोसळले आहे. हवाईदलाच्या विमानाला पुण्याजवळील वाडेबोल्हाईजवळ येथे अपघात झाला आहे.

Dec 13, 2011, 09:07 AM IST

कल्याण: अपघातात ३ ठार

आज पहाटे कल्याण मध्ये झालेल्या एका भीषण अपघातात तीन जण ठार झाले. तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये मायलेक आणि एका पंधरा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मद्यधुंद कारचालकाच्या चुकीमुळं तिघांना प्राणाला मुकावं लागलं.

Dec 10, 2011, 07:30 AM IST

ट्रकच्या धक्क्याने विद्यार्थी जखमी

मागील आठवड्यात मुंबईत स्कूल बसमधून डोकं बाहेर काढलेल्या मुलाला आपला जीव गमावावा लागला होता. तर काल पिकनिकला गेलेल्या डोंबिवलितल्या एका विद्यार्थ्यावर हात गमावण्याची वेळ आली.

Nov 29, 2011, 12:00 PM IST

लक्झरी अपघातात 32 जखमी

लक्झरी बस सिंधुदुर्गातील कणकवलीजवळ गड नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली. यात 32 प्रवासी जखमी झालेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Nov 29, 2011, 10:55 AM IST

बुलढाणा अपघात, 16 मृत्यूमुखी, 35 जखमी

आज पहाटे बुलडाणा जिल्ह्यात मेहेकरजवळ दोन लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले.

Nov 28, 2011, 12:11 PM IST

बसमधून डोकावताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबईत बसमधून बाहेर डोकावताना एका शाळकरी मुलाच्या मृत्यू झाला. आणि यांचे हिंसक पडसाद उमटले आहेत. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सायनच्या वल्लभ शिक्षण संगीत आश्रम शाळेत तोडफोड केली. बसमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केला.

Nov 24, 2011, 03:37 PM IST

बसच्या खिडकीला नाही जाळी, मुलाचा गेला बळी

बसमधून बाहेर डोकावताना एका शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागला. सायनमध्ये अंगावर शहारे आणणाऱ्या या दुर्घटनेत एका ८ वर्षांच्या मुलाला आपला प्राण गमवावा लागलाय. विराज परमार असं या मुलाचं नाव आहे.

Nov 24, 2011, 05:15 AM IST

धुळे रेल्वेची ट्रॅक्टरला धडक, २ ठार

धुळे-चाळीसगाव रेल्वेगाडीने आज रुळ ओलांडणा-या एका ट्रॅक्टरला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर सात जण जखमी झाले.

Nov 9, 2011, 11:09 AM IST

हरिद्वारमध्ये चेंगराचेंगरीत १६ ठार

हरीद्वारमध्ये गायत्री परिवाराच्या एका कार्य़क्रमात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ३० पेक्षा जास्त भाविक गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर १६भाविक ठार झाल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे

Nov 8, 2011, 12:23 PM IST

टँकरनं पाच जणांना चिरडलं

अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगरमध्ये मळीच्या टँकरनं पाच जणांना चिरडलंय. मृतांमध्ये तीन पुरूष एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

Nov 7, 2011, 06:59 AM IST