वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, ११ ठार
बेळगावमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत पावलेले सर्वजण सोलापूरचे रहिवासी आहेत.
Apr 15, 2012, 01:57 PM ISTवाळू माफियांविरोधात नागरिक रस्त्यावर
वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरखाली चिरडल्याने एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर डंपरचालक पसार झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं.
Apr 10, 2012, 05:24 PM ISTपुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघात
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघात झालाय. मुंबईकडून पुण्याकडे जाणारा टेम्पो पलटून हा अपघात झालाय. कामशेत बोगद्याजवळ टेम्पो साईड बारला धडकून अपघात झालाय.
Apr 7, 2012, 03:31 PM ISTसांगलीमध्ये भीषण अपघात
सांगलीत ऊसाचा ट्रक आणि मारुती कारमध्ये भीषण अपघात झालाय. मिरज-पंढरपूर मार्गावर घोरपडी फाट्याजवळ हा अपघात झालाय. या अपघातात शिरपूरच्या गायकवाड कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झालाय.
Apr 7, 2012, 03:04 PM ISTविद्यार्थ्यांचा मृत्यू : बांधकाम, पालिकेला नोटीस
सांगलीतल्या स्कूलबसवर झाड कोसळून तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेला नोटीस बजावलीय. झाडाच्या खबरदारीबाबत या नोटीशीतून खुलासा मागवण्यात आलाय.वनखात्याच्या सल्ल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.
Mar 17, 2012, 09:13 PM ISTसांगलीत झाड कोसळून तीन ठार
सांगली मिरज रोडवर आज इंजिनिअरिंग कॉलेडच्या बसवर झाड कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात आष्टा येथील अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेजचे तीन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झालेत.
Mar 15, 2012, 05:02 PM ISTबस अपघातात २२ विद्यार्थी ठार
बेल्जियन येथील बस अपघातात २२ ठार तर २४ जण जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना घेऊन तीन बस जात होत्या. यातील एक बस स्विस बोगद्यातील भिंतीवर जोरदार धडकली. या अपघातात २२ विद्यार्थी चिरडले गेले. अपघाताच्यावेळी विद्यार्थ्यांच्या किंचाळ्यांनी परीसर हादरून गेला.
Mar 14, 2012, 05:53 PM ISTरेल्वे अपघातांना आळा बसणार का?
जीवघेण्या गर्दीमुळे लोकलमधून पडणे, रेल्वे ट्रॅक ओलांडणे, लोकल प्रवास करतांना रेल्वे खांबाचा धक्का लागणे, लोकलमध्ये चढतांना प्लॅटफॉर्म आणि लोकल ह्यांच्यामध्ये असलेल्या अंतराने अपघात होणे अशा विविध घटनांची गेल्या पाच वर्षातील धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे.
Mar 13, 2012, 03:50 PM ISTहोळीला गालबोट, अपघातात चार विद्यार्थी ठार
कोकणात होळी साजरी करून परतणा-या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर काळानं घाला घातला. देहूजवळ कार आणि ट्रकच्या अपघातात चार जण ठार झालेत.
Mar 8, 2012, 03:20 PM ISTआंगणेवाडी भक्तांवर घाला, २ ठार
संगमेश्वर येथे झालेल्या अपघातात ३ महिला ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची स्थिती गंभीर असून त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कुटुंब मुंबईतील राहणारं आहे.
Feb 25, 2012, 09:20 AM ISTबस अपघातांना वरिष्ठांचा दबाव कारणीभूत!
एसटी बसेसच्या अपघातांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव कारणीभूत असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेनं केला आहे. यापुढे जादा ड्युटी लादल्यानंतर अपघात झाल्यास अधिकाऱ्यांना भर चौकात नेऊन जाब विचारला जाईल असा इशारा संघटनेनं दिला आहे.
Feb 22, 2012, 06:06 PM IST'एक्सप्रेस'वरील अपघातात ४ ठार
एक्सप्रेस हायवेवरील आसूड गावाजवळ एक ट्रक आणि झायलो कार अपघातात नवीमुंबईतील लोखंडे कुटुंबातील चार जण ठार तर सहा जण जखमी झालेत. हा अपघात आज शनिवारी झाला. जखमींना पनवलेमधील एका हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Feb 18, 2012, 05:23 PM ISTगोव्यात बस नदीत कोसळली, तीन ठार
गोव्यातील अल्डोना येथील नदीत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस कोसळली. या अपघात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. बसमध्ये १५ विद्यार्थ्यांसह शिक्षक होते. दोन विद्यार्थी आणि एक शिक्षका अपघातात ठार झाली. हा अपघात आज शनिवारी झाला.
Feb 18, 2012, 04:52 PM ISTनाशिक अपघातात तीन ठार
साईदर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भक्तांवर आज काळाचा घाला झाला. मनमाड-नगर राज्यमहामार्गावर येवलाजवळ आज शनिवारी पहाटे मालट्रक आणि इंडिका कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले. चालकाला डुलकी लागल्याने इंडिका मालट्रकवर धडकली. मृतांमध्ये उच्च न्यायालयातील वकीलाचा समावेश आहे.
Feb 11, 2012, 05:42 PM ISTमुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. एसटी बस आणि इंडिका गाडीत जोरदार धडक झाली. या अपघातात इंडिका कारमधील पाच जण जागीच ठार झालेत.
Jan 22, 2012, 01:31 PM IST