अखेर दत्ता मेघेंचा काँग्रेसला राम-राम, भाजपच्या वाटेवर
काँग्रेसचे नेते आणि वर्ध्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांनी अखेर राजीनामा दिलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आपण राजीनामा पाठवल्याचं दत्ता मेघे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. दत्ता मेघे यांच्यासह समीर आणि सागर मेघे यांनी आपले राजीनामे दिलेत.
Jun 9, 2014, 01:38 PM ISTकाँग्रेस तिकीटावर तर मोदीही निवडणूक हरले असते - निरुपम
काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटलं जर नरेंद्र मोदींनीही काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली असती, तर ते सुद्धा हरले असते. निरुपम यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण होऊ शकतो.
Jun 8, 2014, 12:32 PM ISTया, मला आपल्याशी बोलायचंय! राज ठाकरे नरमले!
`या, मला आपल्याशी बोलायचंय`, अशी हाक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला घातलीय. नेहमी खळ्ळ खट्ट्याकची भाषा वापरणारे राज ठाकरे लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवामुळं `थंड` पडल्याचं दिसतंय.
May 28, 2014, 01:26 PM ISTउद्धव ठाकरे उद्या दिल्लीत, एनडीएच्या बैठकीतही राहणार हजर
नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार आहेत. तसंच दिल्लीत होणाऱ्या `एनडीए`च्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर आजही दिल्लीत बैठकींचा सिलसिला सुरुच आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आज राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक आहे.
May 19, 2014, 01:01 PM ISTकसा ढासळला पुण्यातला काँग्रेसचा बालेकिल्ला?
मतदानापूर्वी आणि मतदानानंतरही चुरशीची वाटलेली पुण्यातील लढत प्रत्यक्षात एकतर्फी ठरली. भाजपच्या अनिल शिरोळेनी काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचा दारूण पराभव केला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरलेल्या पुण्याच्या निकालाचं विश्लेषण करणारा विशेष रिपोर्ट
May 19, 2014, 09:07 AM ISTमोदींचा उत्तराधिकारी मिळाला, आनंदीबेन पटेल नव्या CM?
गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी मिळालाय. आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. आनंदीबेन यांच्या नावाची लवकरच औपचारिक घोषणा होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
May 18, 2014, 04:10 PM ISTदिल्लीत सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा ‘आप’ला समर्थन प्रस्ताव!
दिल्लीत पुन्हा सरकार स्थापनेसाठी आता नवीन घडामोडी घडतायेत. आम आदमी पक्षानं पुन्हा सरकार स्थापन करावी, यासाठी काँग्रेसनं आपला समर्थन प्रस्ताव ‘आप’ला दिल्याचं कळतंय. मात्र याबद्दल अजून अधिकृतरित्या काही स्पष्ट झालं नाही.
May 18, 2014, 11:08 AM ISTबिहारचे नवे मुख्यमंत्री ठरणार? लालूंना घातली साद
बिहारमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सत्ताधारी जेडीयू पक्षाचा पार धुव्वा उडाल्यानं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जेडीयूनं आज आमदारांची बैठक बोलावलीय.
May 18, 2014, 10:16 AM ISTबॉलिवूडमधून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव
लोकसभा निवडणूक 2014 मध्ये आता निकाल स्पष्ट होतोय. बॉलिवूडही या निकालाची वाट पाहतंय. कोण कोण काय म्हणाले ट्विटरवर...
May 16, 2014, 12:15 PM ISTमोदींच्या त्सुनामीनं सेन्सेक्स उसळला, रुपयाही खणखणला!
केंद्रात नरेंद्र मोदी भाजपला मिळत असलेल्या भरघोस यशानंतर आता सेन्सेक्सनंही उसळी घेतलीय. भाजपच्या कमळाप्रमाणेच शेअर बाजारही भलताच फुललाय.
May 16, 2014, 11:52 AM ISTअशी असेल मोदींची `बॉलिवूड कॅबिनेट`!
आज 16व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होतेय. एक्झिट पोलच्या निकालांनंतर नरेंद्र मोदींचं सरकार येणार, असंच बोललं जातंय. नरेंद्र मोदींना जर पंतप्रधान बनल्यानंतर बॉलिवूडमधून आपले नेते निवडायचे असतील तर ते कोणाला निवडतील?
May 16, 2014, 10:12 AM ISTदेशात मोदींची लाट, बहुमतापेक्षा अधिक जागा
लोकसभा निवडणूक 2014 चा अंतिम टप्पा... म्हणजेच निकाल... देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निकालाची प्रत्येकालाच उत्सुकता लागलेली आहे.
May 16, 2014, 06:46 AM ISTखूशखबर! वाराणसीत `अमूल`चा २०० कोटींचा प्रकल्प
निवडणुकीचा निकाल अगदी एका दिवसावर आला असतांना वाराणसीकरांसाठी खरोखरच `अच्छे दिन आने वाले है`... कारण मोदींच्या प्रेमापोटी `द टेस्ट ऑफ इंडिया` म्हणणारा जगप्रसिद्ध मिल्क ब्रँड `अमूल` वाराणसीत दाखल होत आहे.
May 15, 2014, 01:26 PM ISTराहुल परदेशी, सुट्ट्यांमध्ये येतात भारतात- संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे उपाध्याक्ष राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या फेअरवेल पार्टीत राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत "राहुल गांधी हे परदेशी आहेत जे फक्त सुट्ट्यांमध्ये भारतात येतात", असं म्हटलंय.
May 15, 2014, 12:19 PM ISTगांधीनगरमध्ये भाजपच्या ज्येष्ठांची बैठक, महत्त्वपूर्ण चर्चा
गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नरेंद्र मोदींसोबत बैठक झाली. तब्बल पाच तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत निवडणूक आणि एक्झिट पोलवर चर्चा झाली.
May 15, 2014, 10:05 AM IST