जाहिरातींना आवाज देणारी 'ही' सौंदर्यवती आहे तरी कोण? न्याहाळण्यापेक्षा तिचा आवाजच ऐकत राहाल...

Virla Video : एखाद्या तरुणीचा आवाज इतका कमाल कसा असू शकतो? ती बोलत राहते आणि आजुबाजूचे ऐकतच राहतात... ती आहे तरी कोण?  

सायली पाटील | Updated: Feb 1, 2025, 03:40 PM IST
जाहिरातींना आवाज देणारी 'ही' सौंदर्यवती आहे तरी कोण? न्याहाळण्यापेक्षा तिचा आवाजच ऐकत राहाल... title=
Aditi sharma a social media influencerd and a voice over artist who gave voice to many advertisments

Virla Video : जाहिराती... एखादी वस्तू उत्तमरित्या ग्राहकांपुढे सादर करत, तिची मांडणी आणि आखणी करत ग्राहकांना ती खरेदी करण्यासाठी प्रेरणा देणारी एक क्रियाच म्हणावी. ज्या गोष्टीचा सर्वाधिक खप होतो, किंवा एखाद्या संकल्पनेला, योजनेला, व्यक्तीला किंवा अगदी वस्तू, पदार्थाला जेव्हाजेव्हा लोकप्रियता मिळते तेव्हातेव्हा त्यामागे जाहिरातींचं मोठं योगदान असतो. 

हे क्षेत्र आज उदयास आलं असं नाही. तर, कैक वर्षांपासून जाहिरातींचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. काळानुरुप हे माध्यमही अतिशय कलात्मकरित्या बदललं. गेल्या काही वर्षांमध्ये जाहिराती टीव्हीवर, मोबाईलमध्येही सहजरित्या दिसू लागल्या. काही जाहिराती तर, ग्राहकांच्या, थोरामोठ्यांच्या चक्क पाठही झाल्या. 

जाहिराती इतक्या प्रभावीपणे पाहिल्या जाण्यामागचं कारण म्हणजे त्यांची मांडणी आणि त्यातील आवाज. तुम्हाला माहितीये का, कळत नकळत अचानक तुम्ही जी जाहिरात घोकंपट्टी केल्यासारखी बोलायला सुरुवात करता तेव्हा एक ठराविक आवाज, किंवा त्या जाहिरातीतील व्यक्तीच्या आवाजाचा तुम्ही विचार करता. अशाच कैक जाहिरातींना आवाज देण्याचं काम अदिती शर्मा नावाच्या एका Voice Over Artist नं केलं आहे. 

हेसुद्धा वाचा : 12 लाखांपर्यंत सूट अन् Memes मधून सेलिब्रेशन... हे Budget स्पेशल Viral मिम्स पाहून खळखळून हसाल

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditi Sharma (@aditi9sharma)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditi Sharma (@aditi9sharma)

सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर म्हणून नावारुपास आलेल्या या तरुणीचं एक Reel काही दिवसांपूर्वी व्हायरल झालं होतं. जिथं ती सर्वानाच लक्षात असणाऱ्या काही जाहिराती हुबेहुब त्याच शैलीत बोलताना दिसत आहे. अदितीच्या रुपावर भाळणारे कैक असले तरीही तिच्या प्रोफाईलवर असणारी फॉलोअर्सची मोठी संख्या ही खऱ्या अर्थानं तिच्या आवाजाचीच आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.