मनसेशी युतीला नाशिक भाजपमध्ये विरोध
नाशिक महापालिका निवडणुकीतील सत्ता स्थापनेवरून भाजपमध्ये मतभिन्नता दिसून येतेय. मनसेसोबत नवा नाशिक पॅटर्न राबविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसेसह सत्ता स्थापण्यासाठी एक गट अनुकूल असला तरी शिवसेनेला डावलून मनसेसोबत सत्तास्थापन करण्यास एका गटानं विरोध केलाय.
Feb 21, 2012, 07:46 PM ISTकरून दाखवलं, काय उपकार केलेत? - राज
उद्धव ठाकरे यांच्या करू दाखवलं या जाहिरातीची मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी पुन्हा खिल्ली उडवली. निवडून आल्यावर विकास कामे केलीच पाहिजे. करून दाखवलं तर काय उपकार केले का, अशा सवाल राज यांनी विचारला. शहराच्या विकासासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणावर निधी घेत असताना त्यातून शहराचा विकास हा करून दाखवलाच पाहिजे असंही राज म्हणाले.
Feb 18, 2012, 07:02 PM ISTपवारांचा सेनेला छुपा पाठिंबा? - राज
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिवसेनेला मदत केली की नाही हे तपासून पाहावे लागेल. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने दुसऱ्याला मागून सपोर्ट दिला की काय? हेही तपासून पाहायला पाहिजे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी सांगितले. या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विजय झाला की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला याचेही अॅनालिसिस करावे लागेल, असा चिमटा राज यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना काढला.
Feb 17, 2012, 04:36 PM ISTउद्धवच 'अजित' की 'पृथ्वीं'चे राज ?
महापालिकांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
Feb 15, 2012, 02:41 PM ISTराजला 'अग्निपथ' झेपला नाही - उद्धव
बाळासाहेबांसाठी शंभर पावलं पुढे येईन, असं राज ठाकरेंनी मुंबईतील कालच्या सभेत म्हंटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. शंभर पावलं पुढे आलात तरी बाळासाहेबांचा मार्ग झेपेल का, असा सवाल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना केला आहे. ते पुणे येथे बोलत होते.
Feb 14, 2012, 08:38 PM ISTआज प्रचार तोफा थंडावणार
पालिका निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार असल्यानं सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे. शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचता यावं यासाठी ‘रोड शो’वर उमेदवारांनी भर दिला आहे.
Feb 14, 2012, 03:50 PM ISTबाळासाहेबांसाठी सर्वकाही, नादानांसाठी नाही - राज
बाळासाहेब म्हणतात, राज ठाकरेने एक पाऊल पुढे टाकायला हवे, तर मी सांगतो बाळासाहेब तुमच्यासाठी मी १०० पाऊले टाकायला तयार आहे. पण उद्धव आणि त्याच्या चार-पाच नादान टाळक्यांसाठी एक पाऊलही टाकायची तयारी नाही, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले.
Feb 13, 2012, 10:23 PM IST....अखेर राज ठाकरेंना मैदान मिळाले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना गेले काही दिवस मुंबईतील प्रचाराच्या सभेसाठी हवे असणारे मैदान यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झगडावे लागले होते. अखेर राज ठाकरे यांना सभेसाठी मैदान मिळाले आहे. उद्या म्हणजे १३ तारखेला प्रचाराच्या समारोपाची सभा जांबोरी मैदानातच होणार आहे.
Feb 12, 2012, 10:01 PM ISTराज ठाकरेंचा आघाडी, युतीवर हल्लाबोल
काम कसे करायचे याची झलक पाहायची असेल तर माझ्या हातात सत्ता द्या, मी नवा पर्याय दिला आहे. पुण्याच्या विकासासाठी मला सत्ता द्या, असे आवाहन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करत आघाडी, युतीवर हल्लाबोल जोरदार हल्लाबोल चढवला.
Feb 11, 2012, 11:38 PM ISTठाण्यात शिवसेनाप्रमुख, पुण्यात राज गरजणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ठाण्यात रात्री जाहीर सभा होणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा होतेय. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीच्या प्रचारासाठी नागपूरात सभा घेणार आहेत.
Feb 11, 2012, 10:20 PM ISTराज ठाकरेच ठरणार 'किंगमेकर' ?
येत्या महापालिका निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंगमेकरची भूमिका वठवतील. मुंबई पोलीस आणि राज्य गुप्तचर विभाग यांनी महापालिका निवडणुकीचा सर्व्हे रिपोर्ट तयार केला त्यात हे मांडण्यात आलं आहे.
Feb 11, 2012, 03:33 PM ISTठाण्यात आज राज‘गर्जना’
मुंबईत शिवाजी पार्कवर सभेसाठी कोर्टाकडून परवानगी नाकारण्यात आल्यावर राज काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे खासदार आनंद परांजपेंच्या राष्ट्रवादीशी झालेल्या सलगीनंतर शनिवारी बाळासाहेब काय बोलतात याबाबतही तर्कवितर्क लढवण्यात येतायत. त्यामुळे या दोन्ही दिग्गज ठाकरेंच्या ठाण्यातल्या सेंट्रल मैदानातल्या सभेवर सा-यांच्या नजरा असणार आहेत.
Feb 10, 2012, 08:32 PM ISTराज ठाकरेंचा नाशिकमध्ये 'रोड शो'
पुण्यापाठोपाठ राज ठाकरेंचा आज नाशिकमध्ये रोड शो होतोय. नाशिकमध्ये १२२ जागांवर या पक्षाचे उमेदवार आहेत. चांडक सर्कलपासून या रोड शोला सुरुवात झाली आहे. दोन सत्रांमध्ये या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे.
Feb 9, 2012, 04:26 PM ISTमराठी टक्का कमी करण्याचे षडयंत्र- राज ठाकरे
उत्तर भारतीय मुंबईत किंवा पुण्यात मतदान करतात आणि उत्तर प्रदेशात जाऊनही मतदान करतात. एकच व्यक्ती दोनदोनदा मतदान करतो असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील शहरे वेडीवाकडी वाढताहेत आणि मराठी टक्का कमी करण्याचा षडयंत्र राजरोसपणे रचलं जात आहे असा सावधनतेचा इशारा राज ठाकरेंनी दिला.
Feb 8, 2012, 06:40 PM ISTसेना भवनाचा आधार घेणं हा दुबळेपणा- उद्धव
"कुणी कुठे सभा घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी सेना भवनाचा आधार घेणं हे दुबळेपणाचं लक्षण आहे." असा राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला.
Feb 8, 2012, 04:12 PM IST