मुख्यमंत्री

नारायण राणेंचा उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा

नारायण राणे यांनी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी मनधरणीसाठी बोलावलं होतं. मात्र मुख्यमंत्री निवासस्थानीच नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना आपला राजीनामा सोपवला आहे. 

Jul 21, 2014, 01:12 PM IST

राणेंचं मन वळविण्याची 10 जनपथवरही चर्चा

 उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नाराजीमुळं राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरुन दिल्लीत खलबतं सुरु आहेत. याच संदर्भात दिल्लीत दहा जनपथवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधीची भेट घेतली.

Jul 20, 2014, 08:17 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून 'फाम' घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

फाम हौसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अखेर चौकशीचे आदेश दिलेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी चौकशीचे आदेश दिले असून झी मिडियानं हा घोटाळा उघडकीस आणला होता. 

Jul 20, 2014, 03:31 PM IST

'रिंगण'च्या 'संत चोखा मेळा' विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

 सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड संपादित 'रिंगण' वार्षिकाच्या 'संत चोखा मेळा' विशेषांकाचे आज पंढरपुरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झालं. 

Jul 9, 2014, 10:46 AM IST

गोहत्या बंदीसाठी वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले

गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी वारकरी जनआंदोलन समितीनं आंदोलन केलं. वारक-यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या महापुजेपासून रोखण्याचा प्रयत्न केला.

Jul 9, 2014, 09:13 AM IST

यशवंत सिन्हा यांची ‘चू…’क झाली!

बोलताना नेत्यांची जीभ घसरणं... हे तर आता नेहमीचंच झालंय... आता, या नेत्यांच्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नावाचाही समावेश झालाय.

Jul 2, 2014, 06:05 PM IST

कोण होणार मुख्यमंत्री? राज-उद्धव ठाकरे लागलेत कामाला

आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीनं शिवसेना-मनसेनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे आपल्या सहका-यांच्या मदतीनं निवडणुकीसाठी आपापल्या पक्षाची व्यूहरचना आखत आहेत.

Jul 2, 2014, 08:51 AM IST

काँग्रेस लोकसभा पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यावर

 महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर फोडण्यात आलंय. लोकसभेतील पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत झालेल्या चिंतन बैठकीत काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांवर टीकेची तोफ डागली. 

Jun 28, 2014, 10:51 PM IST