अजितदादा गृहखातं घेऊन टगेगिरी दाखवा - राज
राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यावर आपले ठाम मत मांडले.
Aug 23, 2012, 06:57 PM IST...तेव्हा कुठे गेले दलित नेते?
लखनौमध्ये तोडण्यात आलेल्या बुद्ध मूर्तींबद्दलही राज ठाकरेंनी जाब विचारला. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं. बाबरी मशिदीची प्रतिक्रिया मुंबईत उमटली. आता आसाममधल्या दंग्याची प्रतिक्रियाही आधी मुंबईत. नंतर बिहार, झारखंड, लखनऊमध्ये उमटली. काय केलं त्यांनी ?
Aug 21, 2012, 05:26 PM ISTआबा लाज असेल तर राजीनामा द्या- राज ठाकरे
मला महाराष्ट्र धर्माची भाषा कळते. पोलिसांवर आणि भगिणींवर कोणी हात उचलत असेल ते खपवून घेतले जाणार नाही. वाकड्या नजरेने कोण पाहिल त्याची आम्ही गैर करणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.यावेळी आर आर आबा तुम्हाला थोडीशी तरी लाज असेल तर राजीनामा द्या, असे आव्हान राज यांनी गृहमंत्री पाटील यांना दिले.
Aug 21, 2012, 04:47 PM ISTराज ठाकरे यांचे भाषण सुरू
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या विराट मोर्च्याचे नेतृत्व आपल्या हाती घेऊन मरीन ड्राइव्हपासून मोर्च्यात सामील झाले आहेत. आता ते आझाद मैदानापर्यंत ते पायी मोर्च्याचे नेतृत्व करणार आहेत. सध्या राज ठाकरे आझाद मैदानात पोहचले असून थोड्याच वेळात बाषणाला सुरूवात करणार आहेत.
यापूर्वी राज ठाकरे गिरगाव दुपारी १३० मिनिटांनी चौपाटीकडे रवाना झाले आहेत. गिरगाव चौपाटीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. आज सभेमध्ये राज ठाकरे सरकारला जाब विचारणार आहेत. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशीच मागणी मनसेने केली आहे.
Aug 21, 2012, 02:11 PM IST