Yash Dayal : दिल्ली हत्याकांडावर 'यश दयाल'ची वादग्रस्त स्टोरी, प्रकरण पेटलं अन्...

Instagram story on love jihad: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) युवा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) याने त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे मोठा राडा झाल्याचं दिसून आलंय. 

Updated: Jun 5, 2023, 04:30 PM IST
Yash Dayal : दिल्ली हत्याकांडावर 'यश दयाल'ची वादग्रस्त स्टोरी, प्रकरण पेटलं अन्... title=
Yash Dayal, Instagram story, love jihad,

Yash Dayal Instagram Story : काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका हत्येच्या (Delhi Murder Case ) घटनेने हादरली होती. एका अप्लवयीन मुलीची निघृणपणे हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. अशातच या प्रकरणात आता लव जिहादचा (Love Jihad) अँगल असल्याच्या चर्चेने उधाण आलंय. सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. अशातच आता एका पोस्टने (Instagram Story) मात्र खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) युवा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) याने त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे मोठा राडा झाल्याचं दिसून आलंय. दिल्लीत झालेल्या हत्याकांड प्रकरणानंतर यश दयाल याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लव्ह जिहादचा संदर्भ देऊन इन्स्टाग्राम स्टोरी (Yash Dayal Instagram Story) शेअर केली. यश दयालची ही स्टोरी तुफान व्हायरल झाली. त्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल देखील केलं. 

आणखी वाचा - शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी; 'या' 2 टीम खेळणार World Cup 2023 ची फायनल!

यश दयालची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर सोशल मीडियावर यश दयाल ट्रेंड होऊ लागला. प्रकरण आणखी पेटल्याचं पाहता यशने इन्टाग्रामवर आणखी एक स्टोरी पोस्ट करत माफी मागितली आहे. मित्रांनो, नुकतीच चुकून पोस्ट केल्‍या स्टोरीबद्दल माफी मागतो. प्लिझ द्वेष पसरवू नका. मला प्रत्येक समाजाचा आणि समाजाचा आदर आहे, असं म्हणत यशने माफी (Yash Dayal Apologized) मागितली आहे.

पाहा स्टोरी

दरम्यान, यशच्या या चुकीवर नेटकऱ्यांनी संधी सोडली नाही आणि त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. तु गुजरात टायटन्सकडून खेळतो. मोहम्मद शमी आणि राशिद खान यांसारख्या खेळाडूंसह तुला खेळावं लागतं, मग तू असं कसं काय विचार करू शकतो, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला खडेबोल सुनावले आहेत. आधीच रिंकू सिंह (Rinku Singh) यांच्या सलग 5 सिक्समुळे त्याच्या करियरला ब्रेक लागल्याची चर्चा आहे. त्यातच आता त्याची ही इन्टाग्राम पोस्ट त्याच्या क्रिकेट करियरच्या मार्गात अडथळा आणणार की काय? अशी चिंता त्याच्या चाहत्यांना आहे.