मुंबई: IPL 2021च्या हंगामात कोरोनाने शिरकाव केला. 4 खेळाडू आणि 2 कोच यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर IPLचे सामने स्थगित करावे लागले. IPL जरी तात्पुरत्या स्वरुपात थांबलं असलं तरी BCCIचे काम सुरूच आहे. 18 ते 22 जून रोजी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या महाअंतिम सामन्यासाठी आज टीम इंडियातील खेळाडूंचे सिलेक्शन होण्याची शक्यता आहे.
इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यासोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी देखील आजच खेळाडूंचं सिलेक्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना होणार आहे. त्यासाठी ही निवड केली जाणार आहे. आता स्क्वाडमध्ये कोणाला नव्याने संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
IPLच्या 14 व्या हंगामात हार्दिक पांड्याने जास्त फलंदाजीवर भर दिला आहे. फलंदाजीत विशेष पांड्या कामगिरी करू शकला नाही. मात्र रणजी पाठोपाठ पृथ्वी शॉने आपल्या जबरदस्त कामगिरी IPLमध्ये देखील फलंदाजीमध्ये सुरू ठेवली आहे. त्यामुळे पांड्याचा पत्ता कट होऊन पृथ्वी शॉला संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पृथ्वीने IPLच्या 8 सामन्यांमध्ये 308 धावा केल्या आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतीमुळे रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी खेळू शकले नाही. जडेजा आणि अक्षर पटेल पुन्हा संघात परतण्याची शक्यता आहे. अक्षरची इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कामगिरी उत्तम राहिली आहे. दुसरीकडे IPLमध्ये देखील जडेजा आणि अक्षर गमेचेंजर ठरले होते.
जागेसाठी रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांची निवड करण्यात येऊ शकते. प्रसिद्ध कृष्णा आणखी एक खेळाडू आहे, ज्याचे नाव काही काळापासून कसोटी निवडीसाठी सुरू आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने उत्तम कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत तो नवदीप सैनीची जागा घेऊ शकेल. जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी गोलंदाजीसाठी असू शकतील.