मुंबई : यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सगळ्यांचंच लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्या मॅचवर लागलं आहे. रविवारी १६ जूनला हा सामना रंगणार आहे. भारत-पाकिस्तान मॅच म्हणलं की 'मौका-मौका'ची जाहिरात नेहमीचीच आहे. यावेळीही वर्ल्ड कपच्या मॅचचं प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीने 'मौका-मौका'ची नवीन जाहिरात बनवली आहे.
भारत-पाकिस्तानची मॅच ज्या दिवशी होणार आहे त्याचदिवशी म्हणजेच १६ जूनला फादर्स डे आहे. या फादर्स डेचं औचित्य साधून मौका-मौकाची ही जाहिरात बनवण्यात आली आहे. या जाहिरातीत एक जण पाकिस्तानची जर्सी घालून, एक जण बांगलादेशची जर्सी घालून आणि एक जण टीम इंडियाची जर्सी घालून दाखवण्यात आला आहे.
I was waiting for this ad and finally watched this morning. The most awaited match of an ICC event.#MaukaMauka #INDvPAK @StarSportsIndia pic.twitter.com/GVGFGBXWVI
— Abhishek Mishra (@mishraabhi958) June 10, 2019
आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपमध्ये ६ सामने खेळवले गेले आहेत. यातल्या सगळ्या ६ सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे. १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५ या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानचे सामने झाले.