मुंबई : भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग ट्विटरवर सतत अॅक्टीव्ह असतो.
वीरेंद्र सेहवागचे आजचे ट्विट खूपच खास ठरले आहे. भारतीय नागरिक आपल्या सक्षम सुरक्षा यंत्रणेमुळे सुरक्षित राहू शकतात. पणत्यांचे कौतुक फारच क्वचित केले जाते. आज सेहवागने भारतीय सेनेचे कौतुक करण्यासाठी खास ट्विट केले आहे.
सेहवागाने एडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ इनफॉरमेशन इंडियम आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे कौतुक केले आहे.
यंदाच्या वर्षी २०० आंतकवादींचा खात्मा करण्यात सैन्याला यश मिळाले आहे. राजु पोलिसांच्या सूत्रांनुसार, सात वर्षांमध्ये पहिल्यांदा जम्मू काश्मिरमध्ये घुसखोरी करताना २०० आतंकवादींना मारण्यात यश आले आहे.
सेहवागने सैन्याच्या या यशाला गौरवताना खास ट्विट केले. ट्विटरकरांनीदेखील या ट्विटची दखल घेत कौतुकामध्ये सहभाग घेतला.
गेल्या गुरूवारी सुरक्षादलांनी 'डबल ऑपरेशन' मध्ये पाच आतंकवाद्यांना कंठस्नान घात्ले होते. बडगाममध्ये ४ तर सोपोरमध्ये एका आतंकवाद्याला ठार करण्यात आले. यंदाच्या वर्षी जम्मू काश्मीरमध्ये ठार करण्यात आलेल्या आतंकवाद्यांची संख्या २०० वर पोहचली आहे.
क्रिकेट आणि सैन्यदलाचा, पोलिस खात्याचा मेळ साधत ट्विट करताना सेहवाग म्हणाला, एडीजीपीआई आणि जम्मू कश्मीर पोलिस तुमच्या दुहेरी शतकाबद्दल अभिनंदन ! २०१७ मध्ये २०० आतंकवाद्यांचा खातमा केल्याबद्दल तुमचे कौतुक ! जय हिंद
Congratulations to @adgpi and J&K Police for the unbeaten double century this year, eliminating 200 terrorists in 2017 alone. Jai Hind ! May there be peace
— Virender Sehwag (@virendersehwag) December 1, 2017
मेजर अमरदीप सिंह यांच्यावर हल्ल्या झाल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करणारे खास ट्विट सेहवागने केले होते.