Virender Sehwag Angry On Virat Kohli: विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा त्याच्या काळातील धोकादायक फलंदाज म्हणून ओळखला जात होता. टीम इंडियात आक्रमक फलंदाजीची परंपरा सेहवागने सुरू केली. या व्यतिरिक्त अत्यंत प्रभावी अर्धवेळ गोलंदाज म्हणून देखील सेहवाग ओळखला जात होता. मुळ स्वभावाने शांत सेहवाग कधी भडकल्याचं (Virender Sehwag Angry) दिसलं नाही. मात्र, ज्यावेळी तो भडकला, त्यावेळी समोर होता टीम इंडियाचा युवा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli).
नुकतंच एका मुलाखतीमध्ये सेहवागने केलेल्या वक्तव्यामुळे (Virender Sehwag Big Statement) अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एका सामन्यादरम्यान सेहवाग विराट कोहलीवर (Virender Sehwag angry on Virat Kohli) इतका रागावला होता की, त्रिशतक हुकल्यानंतरही त्याला एवढा राग आला नव्हता. सेहवागच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
माझ्या गोलंदाजीदरम्यान विराट कोहलीने मिड-विकेटवर कॅच (Virat Kohli dropped Catch) सोडला तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तिहेरी शतक हुकल्यानंतर मला जितका राग आला नव्हता, तेवढा राग मला विराटने कॅच सोडल्यावर आला होता, असं वक्तव्य वीरूने केलंय. विराट कोहलीच्या फलंदाजीच्या क्षमतेवर कोणालाही शंका नव्हती, असंही सेहवागने (Sehwag On Kohli) यावेळी म्हटलं आहे.
विराट कोहली त्याच्या कारकिर्दीत (Virat Kohli Career) इतक्या उंचीवर पोहोचेल हे कोणालाही माहीत नव्हतं. त्या सामन्यात कॅच सोडल्यानंतर विराटने शतक झळकावलं. त्याच्यात टॅलेंटची कमतरता नाही हे आम्हाला कळून चुकलं होतं. पण तो त्याच्या कारकिर्दीत 70-75 शतकं झळकावेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, असंही सेहवाग यावेळी म्हणाला आहे.
दरम्यान, कॅच सोडल्यावर मी त्याला म्हणालो "कम ऑन यार, तू कॅच पकडायला हवा होता. विराट देखील नाराज झाला आणि त्याने फलंदाजी करताना शतक झळकावलं, असं किस्सा विरेंद्र सेहवाग सांगतो.