Virat Kohli- Anushka sharma Alibaug bungalow : (Indian Cricket Team) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चौफेर कामगिरी करणारा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी आता त्यांचा मोर्चा मुंबईपासून (Mumbai) हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबागच्याची (Alibaug) प्रेमात असल्याचं म्हटलं जात आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्यांच्या अलिबागमधील बंगल्याचे डोळे दिपवणारे काही खास फोटो. सुझान खान हिनं डिझाईन केलेल्या या घरामध्ये SAOTA या आर्किटेक्च्रल फर्मनं घराबाहेरील सजावटीचं काम पाहिलं आहे. (Virat Kohli Anushka Sharma Farmhouse in Alibaug Worth 13 Crore See Inside pics latest marathi news)
2020 पासून लागलेल्या लॉकडाऊन (Lockdown) काळात घरात बंधिस्त राहिल्यानंतर आता विराट आणि अनुष्कानं अलिबागमधील हा बंगला वीकेंड होम (Weekend Home) म्हणून डिझाईन केला आहे. काही माध्यमांम्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार या बंगल्याची किंमत साधारण 10.5 ते 13 कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे. अलिबागच्या आवास येथे हा बंगला असल्याचं सांगण्यात येत आहे.
मॉडर्न आणि क्लासिक सजावटीची सांगड घालणारे काही पर्याय विराटला हवे होते, शिवाय त्याला या घरात काहीशी हिरवळही हवी होती. कुठेच भडकपणा नको, ही त्याची एत अटच होती, असं CEO Aditya Kilachand यांनी सांगितलं.
विराट आणि अनुष्काच्या अलिबागमधील या घराला 4 बेडरूम (Bedroom) आहेत. 2 Fully Covered कार गॅरेज, चार बाथरुम (पावडर रुमसहित), गच्ची, बाहेर जेवणाची सोय असणारा परिसर, प्रायव्हेट पूल (Private pool), आजुबाजूला अमाप जागा आहे. बरं, त्याच्या या वीकेंड होममध्ये ‘advanced air filtration system’सुद्धा आहे. साधारण सप्टेंबरच्या दरम्यान अनुष्का आणि विराटनं मिळून 19.24 कोटी रुपयांना अलिबागमध्ये दोन मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली होती.