Umesh yadav father : क्रिकेट विश्वातून दु:खद वृत्त समोर येत असून भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या (Umesh yadav) वडिलांचे निधन झाले. तिलक यादव यांनी बुधवार 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून उमेशचे वडील आजारी होते. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी तिलक यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना मिलन चौक खापरखेडा येथील त्यांच्या घरी आणण्यात आले.
उमेश यादवचे वडिल तिलक यादव (Tilak Yadav) यांना कुस्तीची मोठी आवाड होती, तर मुलगा उमेशन पोलीस किंवा सैन्य दलात भरती व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, उमेश पुढे जाऊन रणजी क्रिकेट खेळू लागला. त्यातून पुढे भारतीय संघात उमेशला संधी मिळाली. तर, 2010 मध्ये आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याच्यावर बोली लावली. नोव्हेंबर 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध यादवने कसोटीत पदार्पण केले. तो विदर्भाकडून कसोटीत खेळणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला.
वाचा: ऑस्ट्रेलियाचं पारडं जड; कोण जिंकणार आजचा सामना, पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11
तिलक यादव (Tilak Yadav passed away ) मूळचे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील. तिलक यांना दोन मोठ्या मुली आणि धाकटा मुलगा उमेश. कोळसा खाणीत नोकरी मिळाल्याने नागपूरजवळील खापरखेड्यात येऊन ते राहू लागले. सुरुवातीला आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कोणत्याही एकाच मुलाने शिकावे, असे तिलक यांना वाटायचे.