Tokyo Olympics 2020: स्विमर माना पटेल ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी भारताची पहिली महिला

भारतीय महिला स्विमर माना पटेल टोकियोच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र झाली आहे. 

Updated: Jul 2, 2021, 12:19 PM IST
 Tokyo Olympics 2020: स्विमर माना पटेल ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी भारताची पहिली महिला  title=

मुंबई : भारतीय महिला स्विमर माना पटेल टोकियोच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र झाली आहे. यामुळे माना पटेल  टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी पहिली महिला आणि तिसरी भारतीय स्विमर ठरली आहे. भारतीय जलतरण महासंघाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. माना कोट्या युनिवर्सिटी अंतर्गत ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळाला आहे. 21 वर्षीय माना 100 मीटर बॅकस्ट्रोक इव्हेंटमध्ये भाग घेईल.

श्रीहरी नटराज आणि साजन प्रकाश पात्र झाल्यानंतर माना टोकियो ऑलिम्पिकमधील देशातील तिसरी स्विमर ठरणार आहे. साजन प्रकाशने 200 मीटर बटरफ्लाय आणि श्रीहरी नटराज यांनी 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये 'ए' गुण मिळवला. 'युनिव्हर्सिटी' कोट्यातून एका देशातील एक पुरुष आणि एक महिला स्पर्धक ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी देतं. 

क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी माना यांना टोकियो ऑलिम्पिकबद्दल अभिनंदन केलं. किरेन रिजिजू आणि लिहिलं की, “बॅकस्ट्रोक जलतरणपटू माना पटेल #Tokyo2020 पात्रता मिळवणारी पहिली महिला आणि तिसरी भारतीय जलतरणपटू बनली आहे. मी युनिव्हर्सिटी कोट्यातून पात्र ठरलेल्या मानाचं अभिनंदन करतो. वेल डन."

मानाने एका वेबसाईटशी बोलताना सांगतिलं की, "ही एक अद्भुत भावना आहे. मी माझ्या सहकाऱ्यांकडून ऑलिम्पिकविषयी ऐकलं आहे आणि टीव्हीवरही पाहिलं आहे. परंतु जगातील सर्वोत्कृष्ट स्पर्धांमध्ये भाग घेत घेणार असून मी त्या ठिकाणी असणार आहे याचा मला आनंद आहे."

एप्रिलमध्ये, उझबेकिस्तान ओपन जलतरण स्पर्धा होती ज्यामध्ये 21 वर्षीय मानाने 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये एक मिनिट 04.47 च्या वेळेसह सुवर्णपदक जिंकलं होतं.