Team India Qualify for Super 4 Asia Cup: श्रीलंकेच्या पल्लेकल आंतरराष्ट्रीय स्टेडिअमध्ये खेळवल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा 10 गडी राखून पराभव केला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणारा नेपाळचा संघ 230 धावांल ऑलाऊट झाला. त्यानंतर भारताला विजयासाठी 231 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. मात्र, पुन्हा पावसाने एन्ट्री केली अन् सामना थांबवावा लागला. त्यानंतर भारताला 23 ओव्हरमध्ये 145 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी सामना आरामात जिंकला. (India beat Nepal by 10 Wickets)
नेपाळने दिलेल्या 231 धावांच्या पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल ओपनिंग आले. त्यानंतर 2.1 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. टीम इंडियाने बिनबाद 17 धावा केल्या अन् पुन्हा पाऊस आला, त्यामुळे खेळ थांबवावा लागला. त्यानंतर 23 ओव्हरमध्ये 145 धावांचं आव्हान टीम इंडियासमोर होतं. त्याला उत्तर देताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी काम फत्ते केलं. रोहितने 74 धावा केल्या तर शुभमन गिलने 67 धावांची खेळी केली.
पहिली फलंदाजी करणारा नेपाळचा संघ 230 धावांल ऑलाऊट झाला. लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या नेपाळने भारतीय बॉलर्सचा चांगलाच घाम काढला. अनुभवी आणि दिग्गज गोलंदाज घेऊन खेळणाऱ्या टीम इंडियाला नवख्या नेपाळने तब्बल 48 षटकापर्यंत झुंजायला भाग पाडलं.
That's a solid 100-run partnership between #TeamIndia openers
Live - https://t.co/FMAPg9dqRh… #INDvNEP pic.twitter.com/ZQlEWwOGPz
— BCCI (@BCCI) September 4, 2023
कुशाल भुर्तेल आणि आसिफ शेख या सलामीच्या जोडीने नेपाळला दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या 9 ओव्हरपर्यंत नेपाळने एकही विकेट गमावली नाही. अखेर भारताच्या शार्दुल ठाकूरने पहिला धक्का दिला. नेपाळची मधली फळी झटपट बाद झाली. नेपाळचा संघ दोनशे धावांच्या आतच ऑलआऊट होणार असं वाटत होतं. गुलशन झा, दिपेंद्र सिगं, सोमपाल कामी या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत नेपाळ संघाला दोनशे धावांच्या पार नेऊन ठेवलं. दरम्यान, भारतातर्फे मोहम्द सिराज आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतली.