Kapil Dev on R. Ashwin : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. आता फक्त दोन विजय अन् भारताकडे यंदाच्या वर्ल्ड कपची करकरीत ट्रॉफी. या स्पर्धेमध्ये पाचही सामन्यांमध्ये आश्विनला संधी देण्यात आली. मात्र त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही.यावरून माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी भारतीय संघातील अनुभवी खेळाडू आर. आश्निनवर निशाणा साधला आहे. (t20 world cup 2022 ind vs eng Kapil dev on R Ashwin latest marathi sport news)
आर. आश्विनने आतापर्यंत केलेल्या गोलंदाजीमध्ये आत्मविश्वास दिसला नाही. त्याने विकेट घेतल्या मात्र त्याने घेतलेली विकेट ही बॅट्समन त्याच्या चुकीमुळे बाद झाल्याचं दिसून आलं. 1-2 विकेट्स घेत त्याचीच त्याला लाज वाटत असावी. विकेट घेतल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढतो मात्र ज्या आश्विनला सर्वजण आधी पाहत आलो आहोत तो अजुनही दिसला नसल्याचं कपिल देव यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना कपिल देव यांनी युजवेंद्र चहलबाबतही वक्तव्य केलं आहे.
संघ व्यवस्थापनाचा आश्विनवर विश्वास असेल तर चांगलं आहे. कारण आश्विन संपूर्ण टूर्नामेंट खेळला आहे. वेळ पडेल तसा तो पवित्रा घेतो पण जर विरोधी संघाला चकित करायचं असेल रिस्ट स्पिनर म्हणून चहल हा बेस्ट ठरेल. संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराचा विश्वास जिंकणाराच अंतिम 11 मध्ये खेळणार, असंही कपिल देव म्हणाले.
दरम्यान, आश्विनने या T-20 विश्वचषकाच्या पाच सामन्यांमध्ये फक्त 6 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, त्याने केवळ 7.52 च्या इकॉनॉमीवर धावा खर्च केल्या आहेत. सेमी फायनलमध्ये त्याच्या जागी चहलला संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.