Sri Lanka Squad T20Is Against India: श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया 3 टी-ट्वेंटी आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. एकीकडे बीसीसीआयने वेळापत्रक (India vs Sri Lanka series Schedule) जाहीर केलं तर दुसरीकडे श्रीलंकेने देखील संघाची घोषणा केली आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर वानिंदू हसरंगाने कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. मात्र आता श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने चरित असलंकाची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. श्रीलंकेने 16 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.
चरिथ असलंका संघाचा कॅप्टन असेल तर पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल या फलंदाजांवर श्रीलंकेची मदार असेल. तर वनिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, चामिंदू विक्रमसिंगे, मथिशा पाथिराना, नुवान थुसारा, दुनिथ वेल्लालागे, दुश्मंता चामिरा या गोलंदाजांच्या कामगिरीवर देखील लक्ष असणार आहे.
JUST IN - Sri Lanka have revealed their 16-player squad that will take on India in a three-match T20I series at home later this month
Details https://t.co/A0SxhSEvHc
— ICC (@ICC) July 23, 2024
टी-ट्वेंटी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ - चरिथ असलंका (C), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, चामिंदू विक्रमसिंगे, मथिशा पाथिराना, नुवान थुसारा, दुनिथ वेल्लालागे, दुश्मंता चामिरा, बिनुरा फर्नांडो.
टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ - सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोनी, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
पहिला सामना, 27 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
दुसरा सामना, 28 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
तिसरा सामना, 30 जुलै, संध्याकाळी 7 वाजता