शोएब अख्तर-हरभजन सिंग एकमेकांना भिडले, भारत-पाक सामन्यापूर्वी 'ग्रेटेस्ट रिव्हलरी'चा Video Viral

Shoaib Akhtar vs Harbhajan Singh Clash Viral: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ 23 फेब्रुवारीला मैदानात उतरणार आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 10, 2025, 12:21 PM IST
शोएब अख्तर-हरभजन सिंग एकमेकांना भिडले, भारत-पाक सामन्यापूर्वी  'ग्रेटेस्ट रिव्हलरी'चा Video Viral  title=
Photo Credit: @shoaib100mph / X

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना 23 फेब्रुवारीला दुबईमध्ये सामना रंगणार आहे. या सर्वात मोठ्या सामन्यापूर्वी शोएब अख्तर आणि हरभजन सिंग यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले. दोघेही एकमेकांविरुद्ध लढताना दिसत आहेत. ते दोघेही मैदानात एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. ILT20 2025 च्या फायनलपूर्वीचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

भज्जी आणि अख्तर आले आमनेसामने 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा कधी स्पर्धा होते, तेव्हा जल्लोष शिगेला पोहचतो. या सामन्याची चर्चा अगदी एक-एक महिना आधी होते. आता दोन्ही संघ  23 फेब्रुवारीला दुबईत एकमेकांशी भिडणार आहेत. याच आधी आता शोएब अख्तर आणि हरभजन सिंग एकमेकांची चेष्टा करताना दिसले. या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून भारत-पाकिस्तान सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचवली आहे. दोन आठवड्यांपूर्वी भज्जी आणि अख्तर हे एकमेकांशी चेष्टेने भिडताना दिसले.   शोएब अख्तरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हे ही वाचा: IND Vs PAK: "कोहली रऊफ के छक्के छुड़ाएगा…", धोनीने चाहत्यांकडून बोलून घेतल्या मजेशीर घोषणा; Video Viral

 

बघा व्हायरल व्हिडीओ 

 

हे ही वाचा: Video: गिलच्या गरुडासारख्या नजरेतून चेंडू सुटू शकला नाही, 'सुपरमॅन' बनून घेतला झेल

 

'इंडिया-पाक इज द ग्रेटेस्ट रिव्हलरी'

भारत विरुद्ध पाकिस्तान हे क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी म्हणूनही ओळखले जातात. अलीकडेच नेटफ्लिक्सवर भारत-पाक सामन्याविषयी माहितीपट प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्याचे नाव आहे 'इंडिया-पाक इज द ग्रेटेस्ट रिव्हलरी'. 

आता पुढील सामना चॅम्पियन्स ट्रॉफीचा 

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी अख्तर आणि हरभजनने हा व्हिडीओ बनवून चाहत्यांना जुन्या आठवणींची आठवण करून दिली आहे. भज्जी आणि अख्तर जेव्हा खेळायचे तेव्हा भारत-पाक सामन्यादरम्यान दोघेही एकमेकांना सतत स्लेज करत होते आणि चाहत्यांचा थरार शिगेला नेत असत. पण आता सध्याच्या क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये अशा प्रकारची जोरदार चर्चा होताना दिसत नाही. 

हे ही वाचा: पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे 'हे' 7 क्रिकेटपटू नव्हते मुस्लिम, एकाने स्वीकारला होता इस्लाम धर्म

 

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ 23 फेब्रुवारीला मैदानात उतरणार आहे.