'Shane Warne 1000 महिलांसोबत...'; पत्रकाराच्या पुस्तकात मोठा खुलासा

शेन वॉर्न अनेक वादांमध्येही सापडला होता. खासकरून महिलांसोबतचे त्याचे किस्से मीडियामध्ये फार गाजले.

Updated: Mar 5, 2022, 11:30 AM IST
'Shane Warne 1000 महिलांसोबत...'; पत्रकाराच्या पुस्तकात मोठा खुलासा title=

मुंबई : महान लेग स्पिनर शेन वॉर्न याचं काल निधन झालं आहे. शेन वॉर्नच्या अचानक जाण्याने प्रत्येक क्रिकेट चाहता हळहळलाय. त्याच्या 15 वर्षांच्या करियरमध्ये शेन वॉर्नने चांगला खेळ केला. मात्र यावेळी तो अनेक वादांमध्येही सापडला होता. खासकरून महिलांसोबतचे त्याचे किस्से मीडियामध्ये फार गाजले. 

अशातच ब्रिटीश-ऑस्ट्रेलियन पत्रकार पॉल बेरी यांनी शेन वॉर्नच्या बिंधास्त लाईफबद्दल एक पूर्ण पुस्तक लिहिलं आहे. इतकंच नाही तर, या पत्रकाराच्या दाव्यानुसार, वॉर्नने 1000 महिलांसोबत संबंध बनवले होते.

2006 मध्ये या पत्रकाराने त्याच्या 'स्पून आऊट' या पुस्तकात लिहिलं आहे की, शेन वॉर्नने 1000 महिलांशी संबंध ठेवले होते. मात्र तो केवळ 5 वेळाच पकडला गेला आहे. 

पॉल बेरी यांनी शेन वॉर्नच्या एका जवळच्या मित्राच्या हवाल्यानुसार हा दावा केला आहे की, ऑस्ट्रेलियाचा हा महान स्पिनर 1000 पेक्षा अधिक महिलांसोबत झोपला आहे. मात्र यामध्ये केवळ 5 वेळाच त्याचं नाव समोर आलं आहे. 

बेरी यांनी त्यांच्या या पुस्तकात असाही दावा केला आहे की, वॉर्नला 3 महिलांना सेक्स ऑफर करण्याचा आरोपात काढून टाकण्यात आलं होतं. दरम्यान बेरी यांच्या आरोपांनंतर शेनचा भाऊ आणि मॅनेजर जेसन म्हणाला की, पुस्तकात काही नवं असेल याचा विचार केला नव्हता. 

शेन वॉर्नने नेहमी त्याच्यावर झालेल्या या आरोपांचं खंडन केलं. एकदा टेलीग्राफशी बोलताना शेन वॉर्न म्हणाला होता की, "पॉलच्या पुस्तकासंदर्भात मी केवळ इतकंच म्हणेन की, यामध्ये खूप चुका आहेत. ज्यामध्ये 1000 महिलांची गोष्टीचाही समावेश आहे."