Scenario required to reach WTC 25 Final: नुकतंच टीम इंडियाने 4-1 अशा फरकाने इंग्लंडच्या टीमचा धुव्वा उडवला. यावेळी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) यादीत टीम इंडियाने अव्वल स्थान पटकावलं आहे. गेल्या दोन्ही वेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
यावेळी भारतीय संघाला WTC च्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गेल्यावर्षी भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship 2025 ) फायनलमध्ये तिसऱ्यांदा धडक देण्याची संधी आहे. जर टीम इंडियासा यंदाही WTC ची फायनल गाठायची असेल तर कसं समीकरण असणार आहे, ते पाहुयात.
टीम इंडियाला जर तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळावयचं असेल तर आता 10 सामने उरले आहे. यावेळी टीम इंडियाला 10 सामन्यांपैकी 5 सामने जिंकावे लागणार आहे. याशिवाय इतर टीम्ससाठी हे समीकरण कसं आहे ते पाहूयात.
ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये न्यूझीलंडवर क्लीन स्वीप मिळवून भारतीय टीमचा ताण वाढवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 4-1 ने पराभव केला आणि 2023-25 च्या जागतिक टेस्ट अजिंक्यपद स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये स्थान मजबूत केलंय. या निकालानंतर WTC 2023-25 गुणतालिकेतीवर नजर टाकल्यास टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडला पराभूत केल्यानंतर 86.51 च्या विनिंग टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे.