SA vs AUS 2nd ODI: भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा (Australia Cricket Team) संघ कसून तयारी करताना दिसतोय. वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) तयारीसाठी कांगारूंनी साऊथ अफ्रिकेचा दौरा केलाय. यात पाच वनडे सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात दणक्यात विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या मॅचमध्ये देखील दमदार फलंदाजी केलीये. या सामन्यात देखील चमकला तो मार्नस लाबुशेन... मार्नस लाबुशेनने (Marnus Labuschagne) दक्षिण अफ्रिकाविरुद्ध झंजावती शतक ठोकलं आहे. त्यामुळे आता सर्वत्र त्याचं कौतुक होताना दिसतंय. आपल्या दमदार शतकाने त्याने सिलेक्टर्सला चोख प्रत्युत्तर दिलंय.
वर्ल्ड कपसाठी जाहीर झालेल्या संघात मार्नस लाबुशेन याचं सिलेक्शन झालं नाही. मात्र, सध्या सुरू असलेल्या मालिकेत त्याला पर्यायी खेळाडू म्हणून संधी देण्यात आलीये. पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता नगण्य होती. त्यावेळी त्याच्या आईने संघात त्याला संधी मिळेल, असा विश्वास दाखवला होता. त्यानंतर चमत्कार झाला अन् त्याला संघात स्थान मिळालं. त्यानंतर त्याने 80 धावांची दमदार खेळी करत त्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. आता लाबुशेनने शतक ठोकत वर्ल्ड कपमधील अंतिम संघासाठी दावा केलाय.
सध्या सुरू असलेल्या साऊथ अफ्रिका अन् ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यात कांगारूंनी तगडी सुरूवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी 109 धावांची भागेदारी केली. पहिल्या 10 ओव्हरमध्येच त्यांनी 100+ रन्स केल्या होत्या, साऊथ अफ्रिकेच्या मैदानावर अशी कामगिरी करणारी ही ऑस्ट्रेलियाची पहिली जोडी ठरली आहे. हेड बाद झाल्यानंतर वॉर्नरने एक बाजू लावून धरली अन् त्याने देखील दमदार शतक ठोकलं. मिचल मार्श गोल्डन डक झाल्यानंतर मार्नस लाबुशेनने 99 बॉलमध्ये 124 धावांची खेळी केली. यावेळी त्याने तब्बल 19 फोर अन् एक खणखणीत सिक्स देखील लगावला.
A century to savour Marnus Labuschagne!
With family in the stands, the South African-born Aussie raises the bat for his second career ODI #SAvAUS #SAvsAUS #AsiaCup2023 #SLvsBAN pic.twitter.com/zZ1SHCNxyk
— Cric Off (@cric_on_off) September 9, 2023
साऊथ अफ्रिकेचा संघ | क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.
ऑस्ट्रेलियाचा संघ | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (C), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (WK), टिम डेव्हिड, अॅरॉन हार्डी, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा.