IND vs ZIM T20 World Cup: मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या भारत आणि झिम्बाब्वेच्या सामन्यात (India Vs Zim Match) अखेर भारताने 71 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. साऊथ अफ्रिकेच्या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचं सेमीफायनलचं (Team India In Semi Final) तिकीट निश्चित झालंय. त्यानंतर टीम इंडियाने स्वत:च्या जीवावर सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 186 धावा उभारल्या. टीम इंडियाने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची फलंदाजी पत्त्यासारखी ढासळली. अखेरच्या 4 षटकात झिम्बाब्वेला 80 धावांची गरज होती. मात्र, अखेर झिम्बॉब्वेचा 71 धावांनी पराभव झाला आहे. अखेरच्या काही षटकात भारत सामना जिंकेल हे निश्चित झालं होतं. त्याचवेळी (Rohit Sharma fan) एक घटना घडली.
आणखी वाचा- IND vs ZIM : भारताकडून झिम्बाब्वेचा 'सुपडा साफ', 71 रन्सने दणदणीत विजय!
सामन्याची 18 वी ओव्हर सुरू होती. हार्दिक पांड्या झटपट बाद करण्याच्या बेतात होता. त्यावेळी स्कोरबोर्डवर झिम्बाब्वेने 111 धावा लावल्या होत्या. त्यावेळी झिम्बाब्वेचे 9 गडी तंबुत परतले होते. त्यावेळी हातात तिरंगा घेऊन एक तरुण मैदानात आला. सेक्युरिटी गार्डने त्याचा पाठलाग केला. त्यावेळी रोहितच्या जवळ पोहोचलाच होता. तेवढ्यासेक्युरिटी गार्डने त्याला पकडलं. रोहितने (Rohit Sharma heart winning gesture) त्यावेळी जे काही केलं, ते व्हिडीओत पहायला मिळतंय.
Rohit Sharma fans on the Ground #WorldCup #RohitSharma #INDvsZIM pic.twitter.com/i5yfitrBin
— Malav (@Malav273) November 6, 2022
दरम्यान, रोहितने सेक्युरिटी गार्डला (Security guard) विनंती केली. त्याला काहीही करू नका, असं रोहित यावेळी म्हणताता दिसतोय. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत रोहितचं कौतूक केलंय.