IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज सुरु असून यातील चौथा सामना हा 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. शनिवारी भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला रविवारी सराव करत असताना गुडघ्याला बॉल लागल्याने दुखापत झाली होती. त्यामुळे टीम इंडिया आणि फॅन्सचं टेन्शन वाढलं होतं. रोहित मेलबर्न टेस्टमध्ये खेळणार की नाही याबाबत सुद्धा शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र आता रोहितने स्वतः त्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.
रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये भारताचं दुसर ट्रेनिंग सेशन सुरु असताना कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली होती. नेट्समध्ये फलंदाजी करताना रोहित शर्माच्या डाव्या पायाला दुखापत झाली. रोहित शर्मा थ्रोडाउन एक्स्पर्ट दया याच्या बॉलिंगचा सामना करत होते. दयाने टाकलेला बॉल रोहितच्या डाव्या गुडघ्याला लागला. संघाचे फिजियो रोहित शर्माची तपासणी करण्यासाठी आले तेव्हा रोहित वेदनेनं कळवळत होता. रोहितला खुर्चीवर बसवून जिथे बॉल लागला त्या ठिकाणी आइस पॅक लावण्यात आला आणि प्रथमोपचार करण्यात आले. पायाला बॉल लागल्याने रोहितच्या पायाला सूज आल्याचे फिजिओने सांगितले.
हेही वाचा : भारताची फुलराणी PV Sindhu अडकली लग्नबंधनात, उदयपूरमध्ये झालेल्या ग्रँड लग्नाचे Photos समोर
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिज सध्या 1-1अशा बरोबरीत आहे. पर्थ येथे झालेला पहिला सामना हा भारताने तर दुसरा सामना हा ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर गाबा येथे झालेला सामना ड्रॉ झाला. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामने जिंकून WTC फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करणं भारत - ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचं असणार आहे. मेलबर्न टेस्टला अवघे चार दिवस शिल्लक असताना कर्णधार रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे फॅन्स चिंतेत होते. परंतु रोहित शर्माने स्वतः त्याची दुखापत आता बरी असून तो चौथी टेस्ट खेळण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे सांगितले असे वृत्त RevSportz यांनी दिलं आहे. त्यामुळे फॅन्सची चिंता दूर झालेली आहे.
During the practice session, Rohit Sharma was hit on the knee and KL Rahul on the right hand. pic.twitter.com/iod1uPYD6U
— Vipin Tiwari (Vipintiwari952) December 22, 2024
GOOD NEWS FOR TEAM INDIA Rohit Sharma confirms his knee is perfectly fine. [RevSportz] pic.twitter.com/VM3bRxSalV
— Johns. (CricCrazyJohns) December 24, 2024
पहिली टेस्ट: 22 ते 26 नोव्हेंबर
दुसरी टेस्ट: 6 ते 10 डिसेंबर
तिसरी टेस्ट: 14 ते 18 डिसेंबर
चौथी टेस्ट: 26 ते 30 डिसेंबर
पाचवी टेस्ट: 3 ते 7 जानेवारी
एडिलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार दुसरा टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरु होईल.