Shreyas Iyer Double Hundred : मागील अनेक दिवसांपासून टीम इंडियात संधी न मिळालेला स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीच्या सामन्यात दमदार फलंदाजी करून द्विशतक ठोकलं आहे. यासह श्रेयसने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये स्वतःचाच रेकॉर्ड मोडला असून त्याने या सामन्यात मुंबई संघासाठी मोठी कामगिरी केली. ओडिशा विरुद्ध त्याने द्विशतक ठोकलं असून यादरम्यान अय्यरने 22 चौकार आणि 8 षटकार ठोकले आहेत.
मुंबई विरुद्ध ओडिशा यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना खेळला जात असून यात अय्यरने मुंबईच्या पहिल्या इनिंग दरम्यान जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने यात द्विशतक झळकावून बातमी लिहीपर्यंत श्रेयसने 209 बॉलमध्ये 207 धावा केल्या. यादरम्यान अय्यरने 22 चौकार आणि 8 षटकार ठोकले. यासह मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाच्या बाहेर असणाऱ्या श्रेयसने पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठवलं आहे. तसेच या खेळीचा फायदा अय्यरला येत्या आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मध्ये सुद्धा होऊ शकतो. केकेआरला आयपीएलचे विजेतेपद जिंकवून देणाऱ्या श्रेयस अय्यरला आयपीएल 2025 साठी केकेआरने रिटेन केलेलं नाही.
मुंबई विरुद्ध ओडिशा सामन्यात अय्यरने सिद्धेश लाड सोबत चांगली पार्टनरशिप केली. यात सिद्धेश लाडने देखील शतक ठोकले असून यात 285 बॉलमध्ये 136 धावा केल्या. सिद्धेशने या खेळी दरम्यान 16 चौकार लगावले. अय्यर आणि सिद्धेश यांनी 300 हून अधिक धावांची पार्टनरशिप केली. श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड या दोघांनी ओडिशा टीमला अडचणीत आणले आणि मुंबईने 107 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 464 धावा केल्या.
हेही वाचा : ऋषभ पंतची मोठी झेप! ICC टेस्ट रॅंकींगमध्ये मिळाले सहावे स्थान, रोहित अन् विराटला 'जोर का झटका'
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 ची ट्रॉफी उंचावली. मात्र 31 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या केकेआरच्या रिटेन्शन यादीत श्रेयस अय्यरचे नाव नव्हते. त्यामुळे आता श्रेयस अय्यर मेगा ऑस्कनमध्ये येणार आहे. इतर संघ श्रेयसला खरेदी करण्यासाठी उत्सुक असतील. दिल्ली कॅपिटल्स श्रेयसवर मोठी बोली लावू शकते.