FIFA WC 2022: फुटबॉलर पेलेची 'या' टीमला पसंती, विश्वचषकात प्रथमच घडणार असं काही

फीफा वर्ल्डकप स्पर्धेला 20 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला आहे. यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार याबाबत भाकित वर्तवलं जात आहे. या स्पर्धेपूर्वीच काही माजी फुटबॉलपटूंनी आपला अंदाज वर्तवण कोण वर्ल्डकप जिंकणार? याबाबत सांगितलं आहे. 

Updated: Nov 13, 2022, 06:58 PM IST
FIFA WC 2022: फुटबॉलर पेलेची 'या' टीमला पसंती, विश्वचषकात प्रथमच घडणार असं काही title=

FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप स्पर्धेला 20 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला आहे. यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार याबाबत भाकित वर्तवलं जात आहे. या स्पर्धेपूर्वीच काही माजी फुटबॉलपटूंनी आपला अंदाज वर्तवण कोण वर्ल्डकप जिंकणार? याबाबत सांगितलं आहे. ब्राझील यंदाचा वर्ल्डकप जिंकणार असं काही फुटबॉलपटूंचं म्हणणं आहे. ब्राझीलने दक्षिण अमेरिका ग्रुपमध्ये सर्व सामने जिंकत विश्वकप स्पर्धेत स्थान निश्चित केलं आहे. ब्राझीलची विजयी घोडदौड पाहता महान फुटबॉलपटू पेले (Footballer Pele) यांनी यंदाचा वर्ल्डकप ब्राझीलच (Brazil) जिंकेल असं सांगितलं आहे. ब्राझीलने शेवटचा फीफा वर्ल्डकप 2002 (FIFA World Cup 2022) मध्ये जिंकला होता. 

पेलेनं सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केलं आहे. पेले भाकित वर्तवत ब्राझील संघाला पसंती दिली आहे. "जर तुम्ही विचार करत असाल की मी जास्तच आत्मविश्वासू आहे, पण माझं म्हणणं आहे की, ब्राझील पुन्हा एका जेतेपदावर नाव कोरणार आहे.", असं पेले यांनी सांगितलं आहे. फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत ब्राझीलचा पहिला सामना 24 नोव्हेंबरला सर्बिया विरुद्ध असणार आहे. स्पर्धेत ब्राझील ग्रुप जी मध्ये सहभागी आहे. या ग्रुपमध्ये स्वित्झर्लंड आणि कॅमरून संघाचा समावेश आहे. 

FIFA WC 2022: भारतानं FIFA वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी काय करावं? कसा होणार स्पर्धेसाठी क्वालिफाय

या स्पर्धेत पहिल्यांदाच काही बाबी होणार आहेत

सेमीऑटोमेटेड ऑफसाइड तंत्रज्ञान- नव्या तंत्रज्ञानानुसार खेळाडूला ऑफसाइड पोजिशनसाठी ग्राह्य धरलं जाईल. खेळाडूच्या शरीराचा कोणताही भाग प्रतिस्पर्धी संघाच्या हाफमध्ये किंवा गोल रेषेच्या दिशेने असल्यास ऑफसाइड दिलं जाईल. यासाठी बॉलमध्ये सेन्सर आणि लिंब-ट्रॅकिंग कॅमेरा प्रणाली वापरली जाणार आहे. 

पाच खेळाडूंना सब्सीट्यूटची संधी- फीफा विश्वचषकात पहिल्यांदाच तीन ऐवजी पाच खेळाडूंना सब्सीट्यूटची संधी मिळणार आहे. ही घोषणा जूनमध्ये करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. सामना एक्स्ट्रा टाइममध्ये गेल्यास एक खेळाडू सब्सिट्यूटची संधी मिळेल. 

महिला पंच- फीफा पुरुष विश्वचषकात पहिल्यांदाच महिला पंच सामन्याची जबाबदारी सांभाळणार आहेत. या स्पर्धेसाठी 36 रेफ्रींची निवड करण्यात आली आहे.