Paris Olympics 2024 Swapnil Kusale: भारताला आज पॅरिस ऑलिम्पिकमधून थेट गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. खास बाब म्हणजे ही अपेक्षा कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale) या नेमबाजाकडून आहे. स्वप्निल कुसळे आज 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारामधील फायनल खेळणार आहे. ही फेरी खेळणारा स्वप्निल हा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. स्वप्निलची पात्रता फेरीतील कामगिरी पाहता भारताला त्याच्याकडून मेडलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र हा सामना आज नेमकी किती वाजता होणार? कुठे पाहता येणार? यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात...
स्वप्निल कुसळे हा कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय नेमबाज आहे. तो 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारातील नेमबाज आहे. त्याने पात्रता फेरीमध्ये टॉप 8 मध्ये स्थान मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. थ्री-पोझिशन प्रकारातील पात्रता फेरीमध्ये स्वप्निलने एकूण 590 पॉइण्ट्सची कमाई केली. गुडघे टेकून लक्ष्यभेद करण्याच्या प्रकारामध्ये स्वप्निल 198 (99,99) पॉइण्ट्सची कमाई केली. तर प्रोन प्रकारामध्ये 197 (98,99) पॉइण्ट्स मिळवले. उभं राहून लक्ष्यभेद करण्याच्या प्रकारामध्ये स्वप्निलने 195 (98,97) पॉइण्ट्स मिळवले.
आज दुपारी एक वाजता या स्पर्धेची अंतिम फेरी होणार स्वप्निल असून अव्वल तीनमध्ये आल्यास भारताचं आणखी एक पदक निश्चित होणार आहे. हा सामना स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच ऑनलाइन माध्यमातून हा सामना पाहायचा असेल तर जिओ सिनेमा अॅप किंवा जिओसिनेमा डॉट कॉम या वेबसाईटवर दुपारी 1 वजता पाहता येईल.
नक्की वाचा >> कोल्हापूरचा पठ्ठ्या पॅरिस Olympics मधून आणणार गोल्ड? आज सामना; धोनी कनेक्शन चर्चेत
7 व्या दिवशी भारतीय खेळाडूंचे कोणकोणते सामने होणार हे पाहूयात...
गोल्फ
पुरुष वैयक्तिक अंति मफेरीमध्ये गगनजीत भुल्लर आणि शुभंकर शर्मा सामना खेळतील. हा सामना दुपारी 12.30 ला होणार आहे.
नेमबाजी
महिला 50 मीटर रायफऱ थ्री पोझिशनमध्ये (क्वालिफाइंग राऊंड) सिफ्त कौर सामरा व अंजुम मुद्गिल खेळणार आहेत. ही फेरी आज दुपारी 3.30 वाजता पार पडेल.
हॉकी
पुरुष गट साखळी फेरीमध्ये भारताचा बेल्जियमविरुद्ध सामना होणार आहे. दुपारी दीड वाजता हा सामना होणार आङे.
बॉक्सिंग
बॉक्सिंगमध्ये महिला फ्लायवेटचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे. भारताची निकहत झरीन ही यू यू विरुद्ध लढणार आहे. हा सामना दुपारी अडीच वाजता होईल.
तिरंदाजी
पुरुष वैयक्तिक सर्वोत्तम 32 फेरी आज पार पडणार आहे. प्रविण जाधव विरुद्ध काओ वेनचाओ हा सामनाही दुपारी अडीच वाजता होईल.
टेबल टेनिस
भारतीय महिला एकेरीचा उपांत्यापूर्वी फेरीचा सामना दुपारी दीड वाजता पार पडणार आहे.
नौकायान
नौकायानमध्ये पुरुष डिंगी शर्यत 1 च्या फेरीत विष्णी सरवननचा सामना पावणे चार वाजता होणार आहे.
तर महिला डिंगी शर्यत 1 च्या फेरीमध्ये नेथ्रा खुमाननचा सामना सायंकाळी 7.05 ला होणार आहे.
हे सर्व सामने जिओच्या वर उल्लेख केलेल्या प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पाहता येणार आहेत.